विश्‍वास नांगरे पाटील यांच्या नावे हा मेसेज होतोय व्हायरल

अशोक मुरूमकर
Tuesday, 4 February 2020

माहाराष्ट्र पोलिसमधील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने व्हायरल झालेला मेसेज जशाच तसा... ‘छोटी गोष्ट आहे नक्की वाचा’ या मथळ्याखाली व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये म्हटले की, एक बाई चार दिवसापासून बससाठी थांबत होती. एका मुली सोबत मैत्री केली.

सोलापूर : राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रसिद्ध आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक असलेले तरुणाईचे आयकॉन बनलेले विश्‍वास नांगरे पाटील यांच्या नावाने सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर अनेकजण तो मेसेज गृपवरही शेअर करत आहेत.
माहाराष्ट्र पोलिसमधील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने व्हायरल झालेला मेसेज जशाच तसा... ‘छोटी गोष्ट आहे नक्की वाचा’ या मथळ्याखाली व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये म्हटले की, एक बाई चार दिवसापासून बससाठी थांबत होती. एका मुली सोबत मैत्री केली. बस आली. दोघी बसमध्ये चढल्या. एकाच सीटवर शेजारी बसल्या. बस थोडी पुढे गेली. बाईने दोन चॉकलेट काढल्या. एक स्वतः खाल्ले व दुसरे तिला दिले. कोणतीही शंका न येता तिने खाल्ले. काही वेळात चक्कर यायला लागली. ही बाई घाबरली? कंडक्टर गाडी थांबवा. हिला दवाखान्यात न्यायचेय. गाडी थांबली. ती बेशुद्ध होती. बाकीच्या प्रवाशांच्या मदतीने दोघी खाली उतरल्या. बस निघून गेली आणि मागून एक फोर व्हिलर आली. आतून तीन तरूण उतरले. बेशुद्ध मुलीला गाडीत घेतले. त्या बाईला २० हजार दिले. गाडी निघून गेली. यानंतर पुढील चार दिवस अत्याचार होत होते. आणि मग तीला वेश्यांच्या बाजारात एका टोळीला विकले. या काळात तिने अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. घरी संपर्क करण्यासाठी धडपड केली. पण व्यर्थ. ही मुलगी शांत बसणारी नाही आणि वेश्या व्यवसाय करायलाही विरोध करते. मग काय करावे? ही जिवंत ठेवणे फायद्याची नाही. पण हिच्या किडनी, डोळे व रक्त ह्यातुन पैसा मिळवू. आणि जिवंतपणीच तिचे डोळे, किडनी, रक्त आणि इतर अवयवकाढून घेतले. यातच तिचा मृत्यू झाला. एक निष्पाप जीव गेला...
शिक्षा मात्र कुणाला? आम्ही आपणाला विनंती करतो. एखादी मुलगी चुकीचे वागली याचा अर्थ सगळ्याच मुली चुकीच्या असतात हा आपला भ्रम दुर करा. बाहेरच्या अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट खाऊ आणि घेऊ नका. समाजात विकृत लोक भरपुर आहेत. आपण सावध रहा. आज हजारो मुली गायब होत आहेत, अत्याचारासाठी, घरकामासाठी, परदेशात विकण्यासाठी, आतंकवादासाठी, वेश्याव्यवसायासाठी आणि अवयव विक्रीसाठी मुलींना पळवले जाते आणि ठारही मारले जाते. 
महिलांना सावध करा. कृपया हा मॅसेज सर्व जवळच्यांना पाठवा. ज्यांना आई- बहीण आणि मैत्रीण आहे. आपला एक मेसेज आपल्या आईचा... बायकोचा... मुलीचा... बहिणीचा... मैत्रिणीचा... प्रेमीकेचा... जीव वाचवू शकतो... असा आशयाचा मेसेज सध्या नागरे पाटील यांचे वर नाव टाकुन व्हॉट्‌सअॅपवर व्हायरल होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Message viral in the name of Vishwas Nangare Patil