क्राईम ! आजीच्या देखभालीसाठी असलेल्या तरुणाचे नर्ससोबत जुळले अन्‌ पुढे... 

तात्या लांडगे
Sunday, 9 August 2020

अशी आहे हकीकत....

सोलापूर शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गिरीराज शिवानंद आडगळे (रा. माणिक चौक, देशमुख नगर, विजयपूर रोड) याच्या आजीवर ब्रेन ट्यूमरचे उपचार होते.त्यावेळी नर्सिंग कोर्ससाठी त्या रुग्णालयात आलेल्या महिलेशी त्याची ओळख झाली. त्यानंतर त्या महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्या इच्छेविरुध्द शारिरीक संबंध प्रस्थापित केले. नऊ वर्षांनंतरही लग्न न करता महिलेचा सात-आठवेळा गर्भपात केला. विविवाहाला नकार देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला. 

सोलापूर : शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गिरीराज शिवानंद आडगळे (रा. माणिक चौक, देशमुख नगर, विजयपूर रोड) याच्या आजीवर ब्रेन ट्यूमरचे उपचार होते.त्यावेळी नर्सिंग कोर्ससाठी त्या रुग्णालयात आलेल्या महिलेशी त्याची ओळख झाली. त्यानंतर त्या महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्या इच्छेविरुध्द शारिरीक संबंध प्रस्थापित केले. नऊ वर्षांनंतरही लग्न न करता महिलेचा सात-आठवेळा गर्भपात केला. विविवाहाला नकार देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला. 

कौटुंबिक कारणातून पतीपासून विभक्‍त झालेली महिला 2012 मध्ये शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्स करीत होती. आजीच्या सेवेसाठी त्याठिकाणी असलेल्या गिरीराजसोबत तिची ओळख झाली. महिलेने सर्व हकीकत सांगितल्यानंतरही मुलासह तुला आयुष्यभर सांभाळतो, आपण लग्न करू म्हणत गिरीराजने तिच्यासोबत जवळीकता निर्माण केली. त्यानंतर अक्‍कलकोट रोडवरील कुंभारीजवळील एका लॉजवर नेऊन शरीरसंबंध ठेवले. बाळे परिसरातील शिवाजी नगर येथील लॉजवरही जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. महिलेने त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लावल्यानंतर घरच्यांना सांगून मोठे लग्न करू असे सांगत होता. तिच्या इच्छेविरुध्द सात-आठवेळा गर्भपात केला. 2018 मध्ये गिरीराजला नोकरी लागली आणि त्याने आई-वडिलांसह दोन भावांना जुन्नर (आळेफाटा) येथे नेले. त्यानंतर तिला बोलणे सोडून दिले. त्याचे दोन्ही भाऊ व वडील मुलाला सोडून दे म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी देत होते. 4 मे 2020 रोजी गिरीराज महिलेच्या घरी आला आणि किटक मारण्याचा खडू जबरदस्तीने तिच्या तोंडात घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराला वैतागून महिलेने 13 जूनला विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर गिरीराजसह त्याचे भाऊ श्रीनिवास आडगळे, सागर आडगळे, वडील शिवानंद आडगळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. त्यानुसार जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांचा युक्‍तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला. संशयित आरोपीतर्फे ऍड. संतोष न्हावकर यांनी काम पाहिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: met a woman who came to the hospital for a nursing course. He then showed the woman the lure of marriage and established a physical relationship against her will