चाळीस वर्षे नगराध्यक्षपदी राहणारे म्हेत्रे देशात एकमेव : सुशीलकुमार शिंदे 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

सातलिंगप्पा म्हेत्रे वेळेचे भान राखणारी व्यक्तिमत्व होते अक्कलकोट, अफजलपूर, आळंद, जिल्ह्यातून न्याय-निवाडा भांडण तंटे मिटवणे यामध्ये सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे कधीच निवडणुकीत पराभव पत्करला नाही. त्यांच्या निधनाने गोरगरिबांचे कैवारी हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली त्यांनी त्यांच्या जीवनात शिस्तप्रिय, वक्तशिरपणा, नम्रता, अध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम अन्नदान दासोह हे सर्व गुण त्यांनी अंगिकारले होते. सातलिंगप्पा म्हेत्रे हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक होते. अनुभव मंडप होते. असे विचार अनेकांनी व्यक्त केले. 

सोलापूर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्‍याचे नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाची हानी झाली आहे. सातलिंगप्पा म्हेत्रे हे कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते तर होतेच पण कॉंग्रेसचे अभेद्य भिंत होते. ते चाळीस वर्षे दुधनी शहराचे नगराध्यक्ष होते, हे देशातील एकमेव उदाहरण होय, असे मत सुशीलकुमार शिंदे यांनी कॉंग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या शोकसभेत व्यक्त केले. 

यावेळी व्यासपीठावर शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, ऍड. धनाजी साठे, अशपाक बळोरगी, बसवराज शास्त्री हिरेमठ, नगरसेवक बाबा मिस्त्री, तोफिक हत्तुरे, रियाज हुंडेकरी, फिरदौस पटेल, हेमाताई चिंचोलकर, शिवा बाटलीवाला, आरिफ शेख, अरुण शर्मा, सातलिंग शटगार, हरीष पाटील, सुदीप चाकोते आदी उपस्थित होते. 

प्रारंभी (स्व.) सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अलीकडच्या काळात दिगवंत झालेले माजी आमदार शामराव पाटील, सुधाकरपंत परिचारक, ह.भ.प. रामदास महाराज जाधव, भागवताचार्य वा. ना. उत्पात. माजी आमदार यूनुस शेख, फैजु कादरी, बाबासाहेब अवताडे, सुरेखा रुपनवर, मोतीराम राठोड, शिवलिंगप्पा सुकळे आदींच्या दुःखद निधनामुळे शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. 

सातलिंगप्पा म्हेत्रे वेळेचे भान राखणारी व्यक्तिमत्व होते अक्कलकोट, अफजलपूर, आळंद, जिल्ह्यातून न्याय-निवाडा भांडण तंटे मिटवणे यामध्ये सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे कधीच निवडणुकीत पराभव पत्करला नाही. त्यांच्या निधनाने गोरगरिबांचे कैवारी हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली त्यांनी त्यांच्या जीवनात शिस्तप्रिय, वक्तशिरपणा, नम्रता, अध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम अन्नदान दासोह हे सर्व गुण त्यांनी अंगिकारले होते. सातलिंगप्पा म्हेत्रे हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक होते. अनुभव मंडप होते. असे विचार अनेकांनी व्यक्त केले. 

प्रास्तविक शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केले. यावेळी स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्याविषयीही ऍड. धनाजी साठे, अशपाक बळोरगी, विश्वनाथ चाकोते बाळासाहेब शेळके, यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

यावेळी नालिनीताई चंदेले, अक्कलकोट महिला अध्यक्ष मंगला पाटील, सांगोला तालुका अध्यक्ष राजकुमार पवार, माढा चे अध्यक्ष सौदागर जाधव, अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष वसिमभाई पठाण, दिलीप जाधव, हणमंत मोरे, उमेश सुरते, अंबादास गुत्तिकोंडा, शौकत पठाण, सिद्धाराम चाकोते, तिरुपती परकीपंडला, उमाशंकर रावत, राजू जाधव, प्रा सिद्राम सलवदे, मल्लीनाथ सोलापूरे, अनुपम शहा, श्वेता हुल्लेनवरु, प्रियंका डोंगरे, आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : अरविंद मोटे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mhetre is the only mayor in the country who has been the mayor for forty years: Sushilkumar Shinde