कोरोनाच्या धास्तीने ग्रामीण भागात कुटुंबांचे शेतात स्थलांतर 

The migration of families to farms in rural areas due to the threat of corona
The migration of families to farms in rural areas due to the threat of corona
Updated on

वाळूज (ता. मोहोळ, जि. सोलापूर) : लॉकडाउनमुळे पुणे-मुंबईसह विविध ठिकाणांहून गावात दाखल झालेले लोक आणि कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे वाळूज (ता. मोहोळ) येथील 30 ते 35 कुटुंबांनी आपापल्या शेतात स्थलांतर केले आहे. 

वाळूज (ता. मोहोळ) शिवारात जाधव वस्ती आणि घाडगे वस्ती सोडली तर शेतातील वस्त्यांचे प्रमाण नगण्य होते. मात्र "कोरोनाची साडेसाती' सुरू झाली आणि पुणे-मुंबईला कामानिमित्त स्थलांतरित झालेली कुटुंबे गावात दाखल झाली. पुणे-मुंबईसह विविध जिल्ह्यांतून गावोगावी लोक दाखल होत असताना जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर सर्व रस्ते बंद केले असताना लोक अजूनही कसे येत आहेत याबाबत तालुका प्रशासन आणि गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, पोलिस पाटील यांना प्रश्‍न पडला आहे. त्यातच बऱ्याच वर्षांनंतर हे लोक गावात आल्यामुळे सुरू झालेल्या गाठीभेटी प्रशासनाने आणि पोलिस, आरोग्य विभाग तसेच गावपातळीवरील ग्रामपंचायत, पोलिस पाटील यांनी सांगूनही थांबत नाहीत. त्यामुळे कोणाचा संपर्कच नको म्हणून येथील 30 ते 35 कुटुंबे आपापल्या शेतात वस्ती करून राहू लागले आहेत. 
त्यातच सध्या वातावरणात झालेल्या बदलामुळे तापमान चाळिशीच्या पुढे गेले आहे. उष्णतेमुळे पत्राशेड प्रचंड तापत असल्याने लोक उकाड्याने हैराण होत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून दररोज दुपारनंतर आभाळ भरून येते आणि वादळी वारं-कावदान सुटते. माती चोपण्यापुरता सुद्धा पाऊस येत नाही. चार थेंब पडतात. एखादा चांगला पाऊस झाला तर उकाड्याने हैराण झालेल्या लोकांची त्यापासून थोडी सुटका होईल असे वाटते. काही लोक शेतातील वस्ती सोडून पुन्हा गावातील घरी परतले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com