एमआयएमचे नगरसेवक तौफिक यांचे नगरसेवकपद रद्द ! राष्ट्रवादी प्रवेश लांबणीवर 

तात्या लांडगे
Friday, 16 October 2020

दाद मागण्यासाठी 30 दिवसांची मुदत 
नगरसेवक तौफिक शेख हे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सलग सहा महिने हजर होते. त्यामुळे 9 नोव्हेंबर 2019 पासून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय तत्कालीन महापालिका आयुक्‍तांनी घेतला होता. मात्र, त्यानंतर तौफिक शेख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यात सहा महिन्यांचा गैरहजेरीचा कालावधी कुठून- कुठपर्यंत धरायचा, यावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर आयुक्‍तांनी ती नोटीस मागे घेऊन दुसरी नोटीस दिली होती. दरम्यान, नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर तौफिक शेख यांना दाद मागण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

सोलापूर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभांना सतत सहा महिने गैरहजर राहिल्याने महापालिका आयुक्‍तांनी डिसेंबर 2019 मध्ये एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांना अपात्रतेची नोटीस दिली. त्यानंतर शेख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु हे प्रकरण जिल्हा न्यायालयात चालविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार आज सुनावणी झाली. दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व्ही. ए. कारंडे यांनी शेख यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर तौफिक शेख यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेश लांबणीवर पडणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटले असून जिल्ह्यातील नेत्यांच्या संपर्कातही ते होते. 

सोलापूर महापालिकेच्या प्रभाग 21 मधील नगरसेवक तौफिक शेख हे खुन प्रकरणात विजयपूर येथील तुरूंगात होते. त्यावेळी तौफिकला 20 मे 2019 पासून 20 मार्च 2020 पर्यंत महापालिकेच्या सभांना हजर राहता आले नाही. त्याबाबत तत्कालीन नगरसचिव महम्मदरऊफ बागवान यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. दरम्यान, विजयपूर जेलमध्ये असल्याने महापालिका सभेचा अजेंडा व नोटीस मिळालीच नाही. त्यांना कोर्टातून सभेस उपस्थित राहण्यासाठी जामीनही मिळाला नाही. त्यामुळे सभेस उपस्थित राहण्याची इच्छा असतानाही तौफिक शेख सभेला गैरहजर राहिले. या पार्श्‍वभूमीवर तौफिक शेख यांचे नगरसेवकपद रद्द करु नये, असा युक्‍तीवाद करण्यात आला. मात्र, महापालिका कायदा कलम 11 (क) नुसार गैरहजर राहिलेल्या नगरसेवकाला कोणतेही कारण देता येत नाही, असा युक्‍तीवाद महापालिकेतर्फे ऍड. श्रीकृष्ण कालेकर यांनी केला. त्यांचा युक्‍तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने तौफिक शेख यांचे नगरसेवकपद रद्द केले. या प्रकरणात तौफिक शेख यांच्यातर्फे ऍड. एम. ए. शेख, ऍड. पी. एल. देशमुख यांनी तर महापालिकेतर्फे ऍड. कालेकर यांनी काम पाहिले. 

दाद मागण्यासाठी 30 दिवसांची मुदत 
नगरसेवक तौफिक शेख हे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सलग सहा महिने हजर होते. त्यामुळे 9 नोव्हेंबर 2019 पासून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय तत्कालीन महापालिका आयुक्‍तांनी घेतला होता. मात्र, त्यानंतर तौफिक शेख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यात सहा महिन्यांचा गैरहजेरीचा कालावधी कुठून- कुठपर्यंत धरायचा, यावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर आयुक्‍तांनी ती नोटीस मागे घेऊन दुसरी नोटीस दिली होती. दरम्यान, नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर तौफिक शेख यांना दाद मागण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM corporator Taufiq's corporator post canceled! Nationalist admission postponed