
रस्त्यांवरील खड्डे महापालिकेने अद्याप बुजविलेले नाहीत. दुसरीकडे शहराअंतर्गत रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून नागरिक नगरसेवकांना शिव्या देऊ लागले आहेत. त्यामुळे महापालिकेने रस्त्यांची डागडुजी तत्काळ करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी दिला. तर 14 व्या वित्त आयोगातील निधीस सभेने मंजुरी देऊनही कामांना सुरवात झाली नसल्याबद्दल माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.
सोलापूर : रस्त्यांवरील खड्डे महापालिकेने अद्याप बुजविलेले नाहीत. दुसरीकडे शहराअंतर्गत रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून नागरिक नगरसेवकांना शिव्या देऊ लागले आहेत. त्यामुळे महापालिकेने रस्त्यांची डागडुजी तत्काळ करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी दिला. तर 14 व्या वित्त आयोगातील निधीस सभेने मंजुरी देऊनही कामांना सुरवात झाली नसल्याबद्दल माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.
शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते खराब झाले असून, रस्त्यांवरील दिवाबत्तींचीही दुरवस्था झाली आहे. व्हीविकासकामांसाठी मिळेना निधी ! एमआयएम, वंचितसह सत्ताधारी नगरसेवकांचा आंदोलनाचा इशाराआयपी रोड, सात रस्ता ते गांधीनगर रोड, जुना पूना नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, सरस्वती चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. तरीही खड्डे बुजविले जात नाहीत. दरम्यान, सोशल हायस्कूल ते जिंदाशा मदार चौक ते पद्मशाली चौक, किडवाई चौक ते जेलरोड, हॉटेल रॉयल आणि मजदूर क्लब ते कालिका मंदिरापर्यंतचा रस्ता 20 वर्षांपासून तसाच आहे. या ठिकाणचे नागरिक नगरसेवकांविरुद्ध आक्रमक झाले असून महापालिका आयुक्तांनी रस्त्यांचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल, ते स्पष्ट करावे. अन्यथा 6 नोव्हेंबरला दुपारी साडेचार वाजता आंदोलन केले जाईल, असे निवेदन खरादी यांनी दिले आहे. तर एक दिवसाआड पाण्यासाठी नगरसेवक गणेश पुजारी यांनी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
106 नगरसेवकांकडून पत्र घेऊन कामे करावीत
14 व्या वित्त आयोगातून महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत 126 कोटी 32 लाख 87 हजार 552 रुपयांचा निधी मिळाला आहे. निती आयोगातील शिफारशीनुसार तो खर्च करावा लागणार आहे. दरम्यान, सार्वजनिक शौचालये, मुताऱ्या बांधणी व दुरुस्तीसाठी 13 कोटी, कचरा संकलनासाठी 13 कोटी, घंडागाडी दुरुस्ती व इंधनासाठी सहा कोटी आणि स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत मानांकनासाठी 11 कोटी 63 लाख 56 हजार 778 रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, त्यापैकी 26 कोटी 63 लाख 56 हजार 778 रुपयांच्या निधीतून नाले सफाई, सार्वजनिक शौचालये, मुताऱ्यांसाठी व स्वच्छ अभियानाअंतर्गत कामे करण्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. मात्र, अद्याप ही कामे सुरू झालेली नाहीत. आता या कामांची सुरवात करण्यापूर्वी महापालिकेतील 101 नगरसेवक व पाच स्वीकृत नगरसेवकांकडून पत्रे घ्यावीत, अशी मागणी सुरेश पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असाही इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल