Mauland azad arthik vikas mahamandal.jpg
Mauland azad arthik vikas mahamandal.jpg

अल्पसंख्याक महामंडळाची मदार "अत्यल्प' कर्मचाऱ्यांवर

Published on

अल्पसंख्याक हक्क दिन विशेष 

सोलापूर  : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची मदार अतिशय अल्प कर्मचारांवर असून मुंबईतील मुख्यालयासह राज्यातील 35 जिल्हा कार्यालयांसाठी केवळ 45 कर्मचारी काम करत आहेत. या अल्पसंख्याक महामंडळात 7 विविध धर्मांचा समावेश असून राज्याभरातील लाखो अल्पसंख्याकांसाठी काम करणारे हे महामंडळ अतिशय कमी मनुष्यबळावर कार्यरत आहे. 

न्या. रंगनाथ मिश्रा आयोग व सच्चर कमिटी यांच्या अहवालानूसार 2000 साली सप्टेंबर महिन्यात या महामंडळाची स्थापना झाली. सुरवातील सेवा योजना कार्यालयात या मंडळाचा समावेश होता. नंतर 2007 ते 2011 या कालावधीत मिटकॉनच्या माध्यमातून या महामंडळाचे कामकाज करण्यात आले. 450 कोटीची उलाढाल असलेल्या या महामंडळाचा संपर्णू राज्यातील कारभार केवळ 45 कंत्राटी कामागारावर सुरू आहे. मुस्लिम, जैन, ख्रिश्‍चन व नवबौद्ध यांच्यासह पारशी, शिख व ज्यू धर्मियांसाठी कार्यरत असलेल्या या महामंडळातील कार्यकारी व्यवस्थापक व सहाय्यक कार्यकारी व्यस्थापक ही दोनच पदे कायमस्वरुपी असून इतर सर्व कार्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करातात. 

सोलापूर शहर व जिल्ह्यात प्रामुख्याने मुस्लिम, जैन, ख्रिश्‍चन व नवबौद्ध या संवर्गातील लाभार्थी या महामंडळाच्या अर्थसहाय्याचा लाभ घेतात. सध्या प्रामुख्याने शैक्षणिक कर्ज वाटप सुरू आहे. यापूर्वी या महामंडळाच्यावतीने मुदत कर्ज, महिला बचतगटांसाठी कर्ज तसेच थेट कर्ज देण्यात आली. याशिवाय 150 लोकांना मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण देण्यात आले. फॅशन डिझायनिंग व ब्युटी पार्लर प्रशिक्षण राबविण्यात आले आहेत. 

अल्पसंख्याक कल्याण समिती व जिल्हा व्यवस्थापक यांची जिल्हाधिकारी यांच्यासमवेत दर तीन महिन्यांनी बैठक होऊन या महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला जातो. मौलाना आझाद अल्पसंख्याक अर्थिक विकास महामंडळ, उर्दू अकादमी व वक्‍फ बोर्ड, अल्पसंख्याक आयोग व हज कमिटी हे विभाग शासनाच्या अल्पसंख्याक मंत्र्यांच्या अखात्यारित येतात. लवकर उभारण्यात येणाऱ्या उर्दू भवनच्या इमारतीत या महामंडळाचे जिल्हा कार्यालय स्थलांतरित होणार आहे. सध्या कोर्टासमोर भाडेपट्टीने घेतलेल्या जागेत जिल्हा कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. 

आकडे बोलतात 
वार्षिक उलाढाल 450 कोटी 
आतापर्यंतचे कर्ज वाटप 
मुदत कर्ज 783 
महिला बचत गट 161 
थेट कर्ज 20193 
शैक्षणिक कर्ज 539 

लाभार्थ्यांनी घेतलेली कर्ज वेळेत परत केली तर नव्या लाभार्थ्यांना लाभ होऊ शकतो. महामहामंडळ उद्योग व्यावसायासाठी कर्जरुपाने अर्थसहाय्य करते. त्यामुळे वेळेत कर्जफेड केली तर नव्या लोकांना लाभ होईल. 
- सी.ए. बिराजदार 
सोलापूर व सातारा जिल्हा व्यस्थापक, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com