भाजपला मत देऊ नका सांगणारे झाले आमदार; कोण म्हणतय असं वाचा

अशोक मुरुमकर
Saturday, 9 May 2020

२१ मे रोजी राज्यात विधानपरिषदेसाठी मतदान होत आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भवितव्य ठरणार आहे. ते आमदार झाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहणार आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या नऊ जागांपैकी भाजप तीन जागा जिंकेल अशी शक्यता असताना त्यांनी चार उमेदवार जाहीर केले आहेत.

सोलापूर : कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानात महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापले आहे. शुक्रवारी भाजपकडून चार उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. यामध्ये निष्ठावंताना डावल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रीया उमठत आहेत. त्यात ‘भाजपला मत देऊ नका सांगणारे झाले आमदार’ अशी एक प्रतिक्रीया आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्‍नही पडला असेल प्रचारादरम्यान भाजपला मत देऊन नका असं कोण म्हणाले होते. आणि ते आता आमदार होणार आहेत की, झाले आहेत.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
२१ मे रोजी राज्यात विधानपरिषदेसाठी मतदान होत आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भवितव्य ठरणार आहे. ते आमदार झाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहणार आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या नऊ जागांपैकी भाजप तीन जागा जिंकेल अशी शक्यता असताना त्यांनी चार उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनखुळे, माधव भंडारी यांचा पत कट केला आहे. तर राष्ट्रवादीतून प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यासह प्रवीण दडके व डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणूकीवेळी गोपीचंद पडळकर हे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करत होते. त्यांना लोकसभेची उमेदवारीही मिळाली होती. तेव्हा त्यांनी भाजपच्या विरोधात प्रचार केला. भाजपला मते देऊन नका, असा नारा त्यांनी दिला होता. सोलापुरातील पार्क स्टेडीअमवर त्यांचे भाषणही झाले होते. त्यानंतर त्यांनी विधानसभेला भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील हेदेखील भाजपमध्ये येण्यापूर्वी राष्ट्रवादीत होते. त्याआधी त्यांनी भाजप विरोधात प्रचार केला आहे. लोकसभा निवडणूकीवेळी त्यांना भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपकडून विधानपरिषदेसाठी चार नावे जाहीर झाल्यानंतर अनेक प्रतिक्रीया उमटल्या आहेत. यामध्ये समर्थन करणाऱ्याही काही प्रतिक्रीया आहेत. 

फेसबुकवर उमटेलेल्या काही प्रतिक्रीया....
अमोल कंटे यांनी म्हटलं की, भाजपला मत देऊ नका सांगणारे आमदार झाले. ज्यांच्या पिढ्या भाजप सेवेत गेल्या ते उपरे झाले. नरेश पोपळे यांनी म्हटलं की, डिपॉजित जप्त झालेल्या ढाण्या वाघाला विधानपरिषदेत... निष्ठावंत पडळकर मागच दार...टरबूज है तो मुमकिन है, रंगनाथ गावडे यांनी म्हटलं की, खडसेसाहेब तुम्ही ग्रामपंचायतीची तयारी करा, तुम्हाला एवढी खालच्या दर्जाची वागणूक दिली तरी..., ईश्‍वर पाटील यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणीस यांनी एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे, अवधुत वाघ, माधव भंडारी, या पक्षनिष्ठ लोकांना डावलले. गंगाधर भिवाजी इंगोले यांनी म्हटलं की, भाजपला मत देऊ नका म्हणणारे आमदार झाले, पण चार पिढ्या भाजपचे काम करणारे शुन्य. किरण पवार यांनी म्हटलं की, छान काम केले आहे. नवीन पिढीला संधी दिली पाहिजे. हे काम एकाच पक्षाने नाहीतर सर्व पक्षांनी केले पाहिजे. आपल्या कट्टर आणि चांगल्या कार्यकर्त्यांना संधी द्या, नुसते वारसदार पुढे करत जाऊ नका. किरण पाटील यांनी म्हटलं की, ज्यांना उमेदवारी भेटली त्यांचे अभिनंदन, बाकीच्यांनी पश्‍चिम बंगालमध्ये प्रचारपत्रक वाटपासाठी जावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA became those who told BJP not to vote