सचिन कल्याणशेट्टी म्हणतात, ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करा आणि 15 लाख विकासनिधी मिळवा ! 

MLA Kalyanshetti
MLA Kalyanshetti
Updated on

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या प्राप्त परिस्थितीत निवडणुका घेतल्यास कोरोनाची साथही वाढू शकते. त्यामुळे आपल्या गावाची ग्रामपंचायत गावकरी मंडळींनी चर्चा करून बिनविरोध करावी आणि आपल्या गावाच्या विकासासाठी 15 लाखांचा निधी मिळवा, असे आवाहन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे. 

या निवडणुकीविषयी ते म्हणतात, की 2020 मध्ये राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका हा लोकशाहीचा सर्वांत मोठा पाया असतो. जर या निवडणुका सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडल्या तर ती लोकशाहीसाठी चांगली बाब असतेच, शिवाय त्यातून गावाचा एकोपा दिसतो आणि जिथे एकोपा असतो तिथे विकास होण्यास हातभार लागतो. 

सध्या सुरू असणारे कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. निवडणुकांमुळे कोरोना फैलावू शकतो, याची शक्‍यता लक्षात घेऊन मी सर्वांना असे आवाहन करतो, की कृपया आपण सर्वजण एकत्रित येऊन या वेळच्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पाडून एक नवा पायंडा सुरू करूया. यामुळे कोरोनापासून वाचण्यास मदत होईलच, शिवाय प्रशासनावर येणारा ताण कमी होईल आणि निवडणूक खर्चाची बचत सुद्धा होईल. 

आता आमदार कल्याणशेट्टी यांच्या या आवाहनानंतर निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील राजकीय नेते आणि ग्रामस्थ काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. 

अक्कलकोट मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडतील त्या गावांना मी 15 लाख रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देणार आहे. या निधीमधून गावाच्या विकासासाठी भरीव योगदान मिळेल आणि अनेक विकासकामे मार्गी लागतील. 
- सचिन कल्याणशेट्टी, 
आमदार, अक्कलकोट विधानसभा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com