सकल मराठा समाजाचा गनिमीकावा ! घातला आमदार कल्याणशेट्टी यांना घेराव 

राजशेखर चौधरी 
Monday, 14 September 2020

सुप्रिम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने गनिमीकावा पद्धतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना त्यांच्याच कार्यालयात घेराव घालून आंदोलन करण्यात आले. 

अक्कलकोट (सोलापूर) : सुप्रिम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने गनिमीकावा पद्धतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना त्यांच्याच कार्यालयात घेराव घालून आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निवेदन देण्यात आले. 

या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष महेश इंगळे, शहर शिवसेनाप्रमुख योगेश पवार, फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर यांनी मनोगते व्यक्त केली. या वेळी आमदार श्री. कल्याणशेट्टी यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला पाठिंबा असून, सर्व लढायांमध्ये मराठा समाजाच्या अग्रभागी आपण राहू आणि विधानसभेत या प्रश्नावर आवाज उठवू, अशी ग्वाही दिली. या वेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती स्वामीराव पाटील, मध्यवर्ती शिवजयंती उत्सवाचे संस्थापक 
अमोलराजे भोसले, प्रशांत भगरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण घाडगे, प्रहार संघटनेचे विजय माने, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष योगेश पवार यांच्यासह अमोल सुरवसे, भरत राजेगावकर, आकाश गडकरी, प्रथमेश पवार, नितीन शिंदे, वैभव घाडगे, श्री. निंबाळकर, आकाश सूर्यवंशी, राजेश निंबाळकर, कुणाल सूर्यवंशी, वैभव मोरे, मंगेश फुटाणे, कृष्णा माने, शीतल फुटाणे, अक्षय मोरे, शुभम चव्हाण, राजा नवले, पप्पू काळे, ज्ञानेश्वर भोसले, गणेश लांडगे, आकाश शिंदे, महेश निकम, संजय गोंडाळ, रणजित गोंडाळ, गीत पवार, आकाश शिंदे, शुभम मनोरकर यांच्यासह शेकडो मराठा समाजातील युवक उपस्थित होते. 

या गनिमीकावा पद्धतीच्या आंदोलनानंतर पुढील आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी (ता. 15) सायंकाळी पाच वाजता सर्जेराव जाधव सभागृह येथे मराठा समाज कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Kalyanshetty was surrounded on behalf of the entire Maratha community