प्रणिती शिंदे अज्ञानी...'वंचित'च्या रेखा ठाकूर यांची टिका 

तात्या लांडगे
Monday, 24 February 2020

सोलापूर : केंद्र सरकारने संपूर्ण देशात 'सीएए', 'एनआरसी' व 'एनपीआर' लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात सर्वप्रथम वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकरांनी आवाज उठविला. मुंबईत मोठा मोर्चा काढला, त्यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरुध्द आंदोलने सुरु आहेत. मात्र, आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेले वक्‍तव्य त्यांच्या अज्ञानपणाचे लक्षण आहे. प्रणिती शिंदे खूप छोट्या व्यक्‍ती असल्याची टिका वंचित बहूजन महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केली. 

हेही नक्‍की वाचा : भाजपचे खासदार डॉ. महास्वामी यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द 

केंद्र सरकारने संपूर्ण देशात 'सीएए', 'एनआरसी' व 'एनपीआर' लागू करण्याचा निर्णय घेतला, परंतु हे कायदे नेमके काय आहेत, त्याचा फटका कोणाला बसणार आहे याची माहिती अनेकांना नाही. या पार्श्‍वभूमीवर राज्यभर प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केल्याचेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीत ताळमेळ नसून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुधारित नागरिकत्त्व कायद्याबद्दलची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली नाही. दुसऱ्याच्या बॅनरखाली जावून सुधारित कायद्याला विरोध करण्याऐवजी त्यांनी स्वत:ची भूमिका जनतेसमोर मांडण्याचे आवाहनही केले. 

हेही नक्‍की वाचा : विद्यार्थ्यांसाठी गूड न्यूज ! नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयीन निवडणुका 

प्रणिती शिंदे ही छोटी व्यक्‍ती 
राज्यातील महिलांवरील अत्याचार, केंद्र सरकारने केलेल्या सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरुध्द वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख ऍड. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर सातत्याने आंदोलनाद्वारे विरोध करीत आहेत. तरीही कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी वंचित बहूजन आघाडी आता कुठे आहे, असा सवाल करीत ऍड. आंबेडकरांवर टिका केली. परंतु, त्यांच्यावर टिका करण्याएवढी आमदार प्रणिती शिंदे मोठी व्यक्‍ती नाही, असे स्पष्टीकरण रेखा ठाकूर यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत दिले. त्यांना प्रत्युत्तर द्यायला आमची महिला आघाडी सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Praniti Shinde ignorant of deprived Bahujan frontline Rekha Thakur