आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या ! आरक्षण मिळवून देणे हाच सरकारचा हेतू

3praniti_shinde_4.jpg
3praniti_shinde_4.jpg
Updated on

सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाली. परंतु, सत्ताधारी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे तज्ज्ञ वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात भक्‍कम बाजू मांडतील, अशी ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलकांना दिली. तर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हा सरकारचा प्रमुख हेतू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायम राहावे, या मागणीसाठी सोलापूर शहर- जिल्ह्यात सोमवारी (ता. 21) कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्वच आमदारांच्या घरासमोर आसूड ओढा, आंदोलन करण्यात आले. आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासमोरही असे आंदोलन करुन मराठा बांधवांनी त्यांच्याकडे मागणीचे निवेदन सुपूर्द केले. याप्रसंगी आमदार शिंदे यांनी आंदोलकांना आरक्षण मिळवून देण्याची ग्वाही दिली. तत्पूर्वी, मनिषा नलावडे, प्रियंका डोंगरे, लता ढेरे यांनी आसूड ओढत आरक्षणावरील स्थगिती उठवून आरक्षण कायम ठेवण्याची मागणी केली. याप्रसंगी उज्वला साळुंखे, उज्वला खराडे, सुनंदा साळुंखे, राधा पवार, नलिनी जगताप, अभिंजली जाधव, अनिसा जाधव, निर्मला शेळवणे, सुवर्णा यादव, माधुरी चव्हाण, संजिवनी मुळे, माजी महापौर मनोहर सपाटे, नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गणेश देशमुख आदी उपस्थित होते.

ठळक बाबी...

  • शहरात शांतंतेत अन्‌ नियोजनबध्द निघाला मोर्चा
  • सात रस्ता, नवी वेस पोलिस चौकीसमोरील दुकानासह लष्करमधील दुकानांवर दगडफेक
  • आसूड ओढा आंदोलनात महिला तथा तरुणींची लक्षणीय उपस्थिती
  • आमदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलकांना दिली आरक्षणाची ग्वाही
  • आरक्षण का गरजेचे आहे, हे महिला व तरुणींनी लोकप्रतिनिधींना दिले पटवून
  • प्रत्येक आमदारांच्या घराबाहेर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ठिय्या
  • रिपाइंसह सर्वच पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आंदोलनास सक्रिय पाठींबा


'पॅन्टालूम्स'वर दगडफेक
नवीवेस पोलिस चौकी परिसरात भागवत टॉकिजशेजारील 'पॅन्टालूम्स'वर काही तरुणांनी दगडफेक केली. नवी पेठ परिसरातून आलेल्या तरुणांनी साडेबाराच्या सुमारास 'पॅन्टालूम्स'वर दगड भिरकावत काचा फोडल्या. हाकेच्या अंतरावरील नवीवेस पोलिस चौकीतील पोलिसांना त्याची काहीच खबर नव्हती. रस्त्यावरुन ये- जा करणाऱ्या वाहनचालकांकडे पाहून त्यांना काहीतरी घडत असल्याचा अंदाज आला. त्यानंतर त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. तत्पूर्वी, दगडफेक करणारे तरुण पसार झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com