पांडुरग कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार प्रशांत परिचारक यांची निवड 

मनोज गायकवाड 
Thursday, 24 September 2020

येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार प्रशांत परिचारक यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. कारखान्याचे संस्थापक - अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर आमदार प्रशांत परिचारक यांची आज (गुरुवारी) एकमताने निवड करण्यात आली. 

श्रीपूर (सोलापूर) : येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार प्रशांत परिचारक यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. 

कारखान्याचे संस्थापक - अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर आमदार प्रशांत परिचारक यांची आज (गुरुवारी) एकमताने निवड करण्यात आली. 

कारखाना कार्यस्थळावर आज पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विद्यमान उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्यासह संचालक मंडळातील सर्वच सदस्यांनी आमदार परिचारक यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. या सर्वांनी अध्यक्षपदासाठी आमदार परिचारक यांचे नाव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपुढे ठेवले होते. त्यानंतर आमदार परिचारक यांची या पदावर निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

आमदार परिचारक यांचा राजकारण, समाजकारण आणि सहकार क्षेत्रातील व्यापक अनुभव लक्षात घेता पांडुरंग कारखान्याची यशस्वी परंपरा यापुढे कायम चालू राहील, असा आशावाद यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Prashant Paricharak elected as President of Pandurag Sugar Factory