आमदार प्रशांत परिचारक शुक्रवारपासून लोकांना भेटणार

अभय जोशी 
Thursday, 10 September 2020

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे 17 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्याच दरम्यान आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्यासह परिचारक यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना उपचारासाठी पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे सुधाकरपंतांच्या अस्थिविसर्जन प्रसंगी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक हे पंढरपूरला येऊ शकले नव्हते. 

पंढरपूर (सोलापूर) : जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाच्या काळात आमदार प्रशांत परिचारक आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यदेखील पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यामुळे आमदार प्रशांत परिचारक हे त्या वेळी लोकांना भेटू शकले नव्हते. आता आजारावर मात करून आमदार प्रशांत परिचारक हे पंढरपूरला येणार असून, शुक्रवार (ता. 11) पासून दररोज ते लोकांना भेटणार आहेत. 

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे 17 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्याच दरम्यान आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्यासह परिचारक यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना उपचारासाठी पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे सुधाकरपंतांच्या अस्थिविसर्जन प्रसंगी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक हे पंढरपूरला येऊ शकले नव्हते. काही दिवसांपूर्वी परिचारक कुटुंबीयांना पुण्यातील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतु डॉक्‍टरांच्या सल्ल्याने ते पुण्यातच थांबले होते. 

तालुक्‍यातील कार्यकर्ते आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक यांना भेटण्यासाठी आतुर आहेत. अनेक कार्यकर्ते परिचारकांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लक्षात घेऊन प्रशांत परिचारक यांनी व्हिडीओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आपल्याला देखील कार्यकर्त्यांना भेटण्याची ओढ आहे. तथापि डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवसांतच पंढरपूरला येईन, असे त्यांनी स्पष्ट केले होते. 

दरम्यान, आमदार प्रशांत परिचारक यांची प्रकृती सुधारली असून डॉक्‍टरांच्या सल्ल्याने ते अनेक दिवसांनंतर प्रथमच पंढरपुरात येणार आहेत. 11 सप्टेंबरपासून परिचारक यांच्या प्रदक्षिणा रोडवरील वाड्यात सकाळी दहा ते दोन आणि दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळात ते नागरिकांना भेटणार आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Prashant Paricharak will meet the people from Friday