करमाळ्यातील "त्या' नरभक्षक बिबट्याला ठार करा : आमदार संजय शिंदे यांची मागणी 

अण्णा काळे 
Sunday, 6 December 2020

करमाळा तालुक्‍यात बिबट्याने दोन दिवसांत दोन बळी घेतल्याने शासनाने या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी केली आहे. 

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात बिबट्याने दोन दिवसांत दोन बळी घेतल्याने शासनाने या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी केली आहे. 

फुंदेवाडी (रायगाव) येथे 3 डिसेंबर 2020 रोजी बिबट्याने ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेले कल्याण फुंदे यांना ठार केले तर शनिवारी (ता. 5) अंजनडोह येथील जयश्री शिंदे या लिंबुणीच्या बागेत लिंबे गोळा करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर हल्ला करत त्यांना ठार केले आहे. या बिबट्याने दोन्ही व्यक्तींना मारताना मुंडके धडावेगळे केले आहे. हा सर्व प्रकार पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांत दोन जणांचा बळी बिबट्याने घेतल्याने संपूर्ण तालुक्‍यात घराबाहेर पडताना नागरिक जीव मुठीत धरून बाहेर पडत आहेत. 

राज्य वन परिक्षेत्र अधिकारी कपोडकर यांच्याशी आमदार संजय शिंदे यांनी फोनवरून संपर्क साधून करमाळा तालुक्‍यात बिबट्याची दहशत बसली असल्याने या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठर मारण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. 

हा बिबट्या अहमदनगर, बीड भागातून आला असल्याचा अंदाज असून, या भागात बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश वन विभागाने दिले आहेत. हे आदेश सोलापूर जिल्ह्यासाठीही द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sanjay Shinde demanded to kill the man eating leopard in Karmalya