अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : आमदार शहाजी पाटील

Crop Damage
Crop Damage
Updated on

सांगोला (सोलापूर) : तालुक्‍यामध्ये बुधवारी (ता. 16) झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक नागरिकांच्या घरांचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संबंधित नुकसानीचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून अहवाल शासनास सादर करावा, अशा आशयाचे लेखी पत्र आमदार शहाजी पाटील यांनी तहसीलदार यांना दिले आहे. 

सांगोला तालुक्‍यामध्ये बुधवारी (ता. 16) मुसळधार पाऊस पडल्याने तालुक्‍यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे, नागरिकांच्या घरांचे व जनावरांचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका असल्याने येथील शेतकऱ्यांचे जीवन हे शेतीवर मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर अवलंबून असते. यामध्ये देखील निसर्गाने घात केला तर शेतकऱ्यांचे जीवन हे विस्कळित होऊन जाते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व नवी उमेद मिळण्यासाठी शासनाकडून नुकसान भरपाई मिळणे गरजेचे असते. त्यामुळे बुधवारी झालेल्या पावसामुळे तालुक्‍यातील ज्या ठिकाणी पिके व घरांचे नुकसान झाले आहे त्या सर्व ठिकाणचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करावा; जेणेकरून संबंधित नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई शासनाकडून मिळू शकेल, असा आशयाचे लेखी पत्र आमदार शहाजी पाटील यांनी तहसीलदार योगेश खरमाटे यांना दिले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com