आमदार यशवंत माने : राष्ट्रवादीचा आमदार नसलेल्या तालुक्‍यात पक्षाचा विस्तार करा, राष्ट्रवादी ओ. बी. सी. सेलची बैठक 

प्रमोद बोडके
Sunday, 11 October 2020

पक्ष अडचणीत असताना काही आमदार पक्षातून गेले. मात्र राज्यात ओ.बी.सी. प्रवर्गाने राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. ओ. बी. सी. समाजाने राष्ट्रवादीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यावर तिकीट वाटपात अन्याय होतो. हा अन्याय ओ. बी. सी. सेल खपवून घेणार नाही.

- सतीश दरेकर

सोलापूर : पक्षाची बांधणी करणारे पदाधिकारी महत्वाचे असतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री अजित पवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अधिक प्राधान्य आहे. ज्या तालुकत्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार नाही. त्या ठिकाणी आपण कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटीबध्द आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलसह सर्वच सेल व आघाड्यांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी केले. 

जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओ. बी. सी. सेलच्या जिल्हाध्यक्षपदी मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील सरपंच अविनाश मार्तंडे यांची नुकतीच नियुक्ती झाली. या नियुक्तीनंतर जिल्हाध्यक्ष मार्तंडे यांनी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीप्रसंगी आमदार माने बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, ओ.बी.सी. सेलचे पश्‍चिम महाराष्ट्राचे निरीक्षक सतीश दरेकर, प्रभारी लतिफ तांबोळी, सहकार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र हजारे, ओ. बी. सी. सेलचे प्रदेश सरचिटणिस विशाल जाधव, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, ओ.बी.सी. सेलच्या महिला जिल्हाध्यक्षा साधना राऊत, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष आप्पाराव कोरे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष फारुक मटके, ओ. बी. सी. सेलचे जिल्हा सरचिटणीस सचिन भानवसे, कार्याध्यक्ष सलीम शेख, राष्ट्रवादीचे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष बालाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. निरिक्षक दरेकर म्हणाले, यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, जिल्हाध्यक्ष साठे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. शाहुराजे पाटील यांनी सुत्रसंचालन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Yashwant Mane: Expand the party in the taluka where there is no NCP MLA. B. C. Cell meeting