' या ' तालुक्‍यात कोरोनाबाधितांच्या तपासणीसाठी मोबाईल क्लिनिकला मिळतोय प्रतिसाद 

corona.jpg
corona.jpg

मोहोळ(सोलापूर)ः शहरासह तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना तातडीने सेवा मिळावी व बाधितांची संख्या कमी व्हावी यासाठी प्रांताधिकारी सचीन ढोले , तालुका व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी अजिंक्‍य येळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अरुण पात्रुडकर यांनी फिरते मोबाइल क्‍लिनिक हा उपक्रम राबविला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती डॉ पात्रुडकर यांनी दिली. 

मोहोळ शहराला सोलापूर पंढरपूर ही शहर जवळ असल्याने कर्मचारी व्यापारी यांच्यासह सह अन्य नागरिकांची कायम ये जा सुरू असते. तालुक्‍यातील काही गावांना व्यवहारिक दृष्ट्या सोलापूर जवळ असल्याने त्यांची ये जा सोलापूरला असते, त्यामुळे शहरासह तालुक्‍यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ही चिंतेची बाब ठरली आहे. ज्या गावात पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत त्यांना त्वरित सेवा मिळावी यासाठी फिरते मोबाईल क्‍लीनीक हा उपक्रम सुरू केला आहे .ज्या ठिकाणी रुग्ण सापडले आहेत त्या ठिकाणच्या आरोग्य कर्मचाऱ्याने फिरत्या मोबाइल क्‍लिनिक व्हॅनला मोबाइल करून सांगितले तर काही मिनिटातच याठिकाणी पोहोचून रुग्णांची पुढील प्रक्रिया वेगाने होते त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळत आहे. मोबाइल क्‍लिनिक मध्ये एक डॉक्‍टर फार्मासिस्ट व आरोग्य सहाय्यीका अशा तिघांची नियुक्ती केली आहे. 

मोहोळ तालुक्‍यात बुधवार पर्यंत तीनशे आठ जणांना कोरोनाची बाधा झाली होती, 200 जण बरे होऊन घरी गेले आहेत तर 166 जणावर उपचार सुरू आहेत. उपचारासाठी दाखल होण्यापेक्षा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. फिरते मोबाइल क्‍लिनिक ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. पी. गायकवाड, डॉ बालाजी गवाड आदी परिश्रम घेत आहेत. 
दरम्यान शहरातील सर्व मेडिकल व्यावसायीकांची तपासणी झाली आहे. तसेच किराणा, कापड पानपट्टी, व्यवसायिक यासह अन्य व्यवसायिकांची तपासणी होणे गरजेचे आहे. कारण या व्यावसायिकांचा थेट ग्राहकांशी संपर्क होत असल्याने तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे असे डॉ. पात्रुडकर यांनी सांगितले.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com