सरकारची मानसिकता नसल्यानेच मराठा आरक्षणाला स्थगिती : धैर्यशील मोहिते-पाटील

शशिकांत कडबाने 
Thursday, 10 September 2020

धैर्यशील मोहिते - पाटील म्हणाले, सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत बाजू मांडण्यासाठी केलेला उशीर व हवी तितकी तत्परता दाखविली नसल्याने स्थगिती मिळाली असून यामुळे समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण राहणार नाही. यामुळे समाजाचे अतोनात नुकसान होणार आहे. सरकारची खरंच आरक्षण टिकवण्याची मानसिकता असती तर आज आरक्षणाला स्थगिती मिळालीच नसती. 

अकलूज (सोलापूर) : मराठा आरक्षण टिकवण्याची सरकारची मानसिकता नसल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. या स्थगितीमुळे मराठा समजातील घटकांना फटका बसणार आहे. याला महाविकास आघाडीचे शासन जबाबदार असल्याचे मत भाजपचे नेते धैर्यशील मोहिते - पाटील यांनी व्यक्त केले. 

धैर्यशील मोहिते - पाटील म्हणाले, सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत बाजू मांडण्यासाठी केलेला उशीर व हवी तितकी तत्परता दाखविली नसल्याने स्थगिती मिळाली असून यामुळे समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण राहणार नाही. यामुळे समाजाचे अतोनात नुकसान होणार आहे. सरकारची खरंच आरक्षण टिकवण्याची मानसिकता असती तर आज आरक्षणाला स्थगिती मिळालीच नसती. सरकारने सकल मराठा समाजाची शुद्ध फसवणूक केली आहे. 

शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास कायद्यांतर्गत मराठा समाजाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आरक्षण देण्यात आले होते. हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी महाविकास आघाडीची होती. पण सरकारने जाणीवपूर्वक आरक्षणाचा प्रश्न किचकट केला आहे. या सरकारने सारथी संस्थेला सुद्धा तुटपुंजी मदत करत मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे म्हणत श्री. मोहिते - पाटील यांनी, मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याची टीका केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohite Patil said that the Maratha reservation was postponed due to lack of mentality of the government