दहावी निकालात मोहोळ अव्वल, जिल्ह्याचा निकाल 97.53 तर मोहोळचा 98.56 टक्के 

प्रमोद बोडके
बुधवार, 29 जुलै 2020

राज्यातील 2 लाख 50 हजार 168 विद्यार्थी उत्तीर्ण 
महाराष्ट्रातून दोन लाख 58 हजार 204 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख 57 हजार 8 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी 2 लाख 50 हजार 168 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. राज्याचा दहावीचा निकाल 97.34 टक्के लागला आहे. राज्यातील 26 हजार 688 रिपिटर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 26 हजार 271 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 20 हजार 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रिपिटर विद्यार्थ्यांचा राज्याचा निकाल 76.14 टक्के लागला आहे. 

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल 97.53 टक्के लागला आहे. जिल्ह्यात मोहोळ तालुक्‍याने बाजी मारली असून या तालुक्‍याचा निकाल सर्वाधिक 98.56 टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यात सर्वांत कमी निकाल करमाळा तालुक्‍याचा 96.31 टक्के लागला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील 968 शाळांमधील 63 हजार 594 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 63 हजार 193 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती 61 हजार 633 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सोलापूर जिल्ह्याचा तालुकानिहाय लागलेला निकाल याप्रमाणे : अक्कलकोट 96.43, बार्शी : 98.28, करमाळा, 96.31, माढा 97.26, माळशिरस 97.24, मंगळवेढा : 97.61, मोहोळ 98.56, पंढरपूर : 97. 57, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व सोलापूर शहर : 97.63, सांगोला तालुक्‍याचा दहावीचा निकाल 97.78 टक्के एवढा लागला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील रिपीटर विद्यार्थ्यांचा जिल्ह्याचा निकाल 81.58 टक्के लागला आहे. 968 शाळांमधील 5 हजार 888 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 5 हजार 847 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 4 हजार 770 रिपीटर विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 97.9 टक्के लागला आहे. पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकविला आहे. सोलापूर जिल्ह्याचा निकाल 97.53 टक्के लागला आहे. नगर जिल्ह्याचा निकाल 96.10 टक्के लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 97.34 टक्के लागला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohol tops in 10th result, District's result is 97.53 and Mohol's is 98.56 percent