esakal | ऐकावे ते नवलच एक हजार रुपयासाठी त्याने केली चक्क माकडाची दाढी : video
sakal

बोलून बातमी शोधा

Monkey beard video goes viral on social media

कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्‍यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद आहेत. यामुळे अनेकांनी दाढी कटींग घरीच केल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. काहींतर कटींग करायचे टेन्शन नको म्हणून एकदाच टकल करुन टाकले. 

ऐकावे ते नवलच एक हजार रुपयासाठी त्याने केली चक्क माकडाची दाढी : video

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्‍यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद आहेत. यामुळे अनेकांनी दाढी कटींग घरीच केल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. काहींतर कटींग करायचे टेन्शन नको म्हणून एकदाच टकल करुन टाकले. 
अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर सेवा बंद आहेत. यामुळे रोजीरोटीचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

कोरोना व्हायरसच्या या संकटकाळात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक न्हावी माकडाची दाढी करत आहे. लॉकडाऊनच्या काळात सलूनची दुकाने बंद आहेत. त्यामुळे त्यांचेही काम बंदच आहे. काही सलून व्यवसायिक ग्रामीण भागात शेतात कटींग करताना दिसत आहेत.
सलून बंद असल्यानं त्यांच्याही हाताला काम नाही. यातच एक माणूस केस कापणाऱ्याला चॅलेंज देतो की जर तो माकडाची दाढी करेल तर त्याला एक हजार रुपये देईल. तेव्हा न्हाव्यानं माकडाची दाढी केली. माकडही दाढी होईपर्यंत गप्प बसले होते. बिहारमधल्या ही घटना असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, अधिकृतपणे कोठे घडले हे समजले नाही.

एक माणूस सलूनवाल्याकडे आला आणि त्यानं पाळीव माकडाची दाढी करण्यास सांगितलं. त्या माणसानं माकडाची दाढी करण्याचं चॅलेंज दिलं. माकडाची दाढी केल्यास हजार रुपये देईन असं तो म्हणाला. सलूनवाल्यानं यातून पैसे मिळतील म्हणून चॅलेंज स्वीकारलं.
चॅलेंज स्वीकारताच सलूनवाल्यानं माकडाची दाढी करायला सुरुवात केली. याचा व्हिडिओ त्याठिकाणी उभा असलेल्या काही लोकांनी शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दिसतं की माकडही आरामात दाढी करून घेत आहे. यावेळी माकड पूर्ण शांत बसल्यानं लोकांनाही आश्चर्य वाटत आहे.