सोलापुरात 31 ते 50 वयोगटातील सर्वाधिक रुग्ण ! आज 36 पॉझिटिव्ह; सैफूल, जुळे सोलापूर, विजयपूर रोड परिसरातील रुग्ण 

तात्या लांडगे
Thursday, 19 November 2020

ठळक बाबी... 

 • शहरातील एक लाख 11 हजार 291 संशयितांची कोरोना टेस्ट 
 • आतापर्यंत शहरात आढळले दहा हजार 43 कोरोना पॉझिटिव्ह 
 • एकूण रुग्णांपैकी आठ हजार 999 रुग्णांची कोरोनावर मात 
 • शहरातील एकूण रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण 31 ते 50 वयोगटातीलच 
 • आज एकही मृत्यू नाही; मृतांची संख्या 557, तर मृतांमध्ये सर्वाधिक 60 वर्षांवरील व्यक्‍ती 
 • सद्यस्थितीत 303 पुरुष आणि 184 महिला रुग्णांवर सुरु आहेत उपचार 

सोलापूर : शहरातील कोरोना बाधितांची संख्या अद्यापही कमी झालेली नाही. आज 817 संशयितांमध्ये 36 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे शहरात आज एकही मृत्यू झालेला नाही. दरम्यान, शहरात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण 31 ते 50 वयोगटातील आहेत. 

ठळक बाबी... 

 • शहरातील एक लाख 11 हजार 291 संशयितांची कोरोना टेस्ट 
 • आतापर्यंत शहरात आढळले दहा हजार 43 कोरोना पॉझिटिव्ह 
 • एकूण रुग्णांपैकी आठ हजार 999 रुग्णांची कोरोनावर मात 
 • शहरातील एकूण रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण 31 ते 50 वयोगटातीलच 
 • आज एकही मृत्यू नाही; मृतांची संख्या 557, तर मृतांमध्ये सर्वाधिक 60 वर्षांवरील व्यक्‍ती 
 • सद्यस्थितीत 303 पुरुष आणि 184 महिला रुग्णांवर सुरु आहेत उपचार 

 

शहरात आज वॉटर फ्रंट, फेज- दोन, वैष्णवी नगर, अध्यापक नगर (विजयपूर रोड), विश्राम सोसायटी, लक्ष्मी- विष्णू सोसायटी, शिवदारे कॉलेजवळ, संतोष नगर, कोर्णाक नगर, चंदन गनर, सहस्त्रार्जून नगर (जुळे सोलापूर), सेटलमेंट कॉलनी क्र.दोन, केशव नगर पोलिस वसाहत, इंद्रधनू अपार्टमेंट, इंडियन मॉडेल स्कूलजवळ, कल्याण नगर (होटगी रोड), आदित्य नगर (आरटीओ कार्यालयाजवळ), माशाळ वस्ती, चंडक विहार, सोहम प्लाझा, उध्दव नगर, सिध्दी विनायक नगर (सैफूल), मंत्री चंडक कॉम्प्लेक्‍स (बुधवार पेठ), राठी हॉस्पिटल (टिळक चौक), सम्राट चौक, कमल नगरी (हैदराबाद रोड) आणि मरिआई चौक (देगाव रोड) येथे नवे रुग्ण आढळले आहेत. 

क्‍वारंटाईनचा घोळ कायम 
शहरातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 487 आहेत. दुसरीकडे रुग्णांच्या संपर्कातील संशयितांची संख्या सद्यस्थितीत 149 इतकी आहे. त्यात 103 जण होम क्‍वारंटाईनमध्ये, तर 46 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. दररोज शहरात 20 ते 30 च्या सरासरीत रुग्ण आढळत असतानाही क्‍वारंटाईनमधील संशयितांची संख्या वाढलेली दिसत नाही. आतार्यंत शहरातील 28 हजार 673 संशयित होम क्‍वारंटाईनमध्ये होते. तर 14 हजार 375 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most patients in the age group of 31 to 50 in Solapur! Today 36 positive; Patients from Saiful, Twin Solapur, Vijaypur Road area