शहरातील 24 नंबर प्रभागात सर्वाधिक रुग्ण ! आज 68 पॉझिटिव्ह अन्‌ दोघांचा मृत्यू 

तात्या लांडगे
Saturday, 19 September 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील 75 हजार 21 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत 67 हजार 197 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह 
  • शहरात आढळले आतापर्यंत सात हजार 824 रूग्ण 
  • आतापर्यंत 454 रुग्णांचा झाला मृत्यू; साडेसहा हजारांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात 
  • आज 477 संशयितांपैकी 68 पॉझिटिव्ह; 62 वर्षांवरील दोघांचा मृत्यू 

सोलापूर : शहरातील संशयितांची टेस्टिंग कमी झाली असून दुसरीकडे एकूण टेस्टच्या 12 ते 16 टक्‍के व्यक्‍ती पॉझिटिव्ह आढळत आहेत. आता शहरातील एकूण रुग्णसंख्या सात हजार 824 झाली असून मृतांची संख्या 454 वर पोहचली आहे. आज दक्षिण कसब्यातील 65 वर्षीय पुरुषाचा, तर सोनी नरातील 62 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे. शहरातील एकूण 26 प्रभागांपैकी 24 क्रमांक प्रभागात सर्वाधिक 662 रुग्ण आढळले आहेत.

 

ठळक बाबी... 

  • शहरातील 75 हजार 21 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत 67 हजार 197 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह 
  • शहरात आढळले आतापर्यंत सात हजार 824 रूग्ण 
  • आतापर्यंत 454 रुग्णांचा झाला मृत्यू; साडेसहा हजारांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात 
  • आज 477 संशयितांपैकी 68 पॉझिटिव्ह; 62 वर्षांवरील दोघांचा मृत्यू 

 

उत्तर कसबा, व्हीएमजीएमसी बॉईज हॉस्टेल (होटगी नाका), जुना पुना नाका (गणेश नगर), जाकिया रेसिडेन्सी (बुधवार बाझार), शनिवार पेठ, मॉर्डन हायस्कूलजवळ, इंदिरा नगर, जानकी नगर, भाग्यलक्ष्मी पार्क, आर्य चाणक्‍य नगर, वामन नगर (जुळे सोलापूर), वैष्णवी नगर, सुंदरम नगर, प्रल्हाद नगर, राजस्व नगर, सुशिल नगर (विजयपूर रोड), जुनी मिल चाळ, लोकमंगल विहार (बाळे), आसरा, होटगी रोड, शेटे नगर (लक्ष्मी पेठ), मंत्री चंडक कॉम्प्लेक्‍स (बुधवार पेठ), टिळक चौक, बाळे, शिवाजी नगर, गीता नगर (न्यू पाच्छा पेठ), दक्षिण कसबा (चौपाड), बालाजी अपार्टमेंट, एसआरपी कॅम्प, अमृत नगर, वैष्णवी नगर (सैफूल), अरविंदधाम पोलिस वसाहत, पश्‍चिम मंगळवार पेठ (बुधले गल्ली), साई अपार्टमेंट (होटगी रोड), गोसकी नगर (कुमठे), आशिर्वाद नगर (मजरेवाडी), महात्मा फुले गृहनिर्माण, लिमयेवाडी, भूषण नगर, इंद्रधनू अपार्टमेंट, कुंभार वेस (जैन मंदिराजवळ), साखर पेठ, कामाक्षी नगर (शेळगी), इंद्रधनू (मरिआई चौक), वानकर वस्ती (देगाव), साहिल नगर, आय ग्रूप विडी घरकूल, न्यू पाच्छा पेठ, आंबेडकर नगर (तालुका पोलिस ठाण्याजवळ) याठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे.

शहरातील 12 प्रभागात पाच हजारांपर्यंत रुग्ण
शहरात एकूण 26 प्रभाग असून त्यापैकी 24 नंबर प्रभागात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे 26 नंबर प्रभागात 593, पाच नंबर प्रभागात 523, सात नंबर प्रभागात 448, 21 नंबर प्रभागात 381, तीन नंबर प्रभागात 317, सहा नंबर प्रभागात 308, आठ नंबर प्रभागात 329 आणि 14 नंबरमध्ये 347 रुग्ण आढळले आहेत. तसेच 15 नंबर प्रभागात 309, 21 नंबर प्रभागात 381, 23 नंबरमध्ये 324 आणि 25 नंबर प्रभागात 363 रुग्ण आढळले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most patients in ward number 24 of the solapur city Today, 68 positive and two died