आईचा कोरोनामुळे मृत्यू ! मुलगा निघाला आत्महत्येसाठी, पण 'ते' दोघे देवदूत होऊन मदतीला धावले

0maharashtra_police_2 (1).jpg
0maharashtra_police_2 (1).jpg

सोलापूर : कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्यानंतर मुलगा श्रीनिवास राजकुमार भोसले (वय 38) हा सतत तणावाखाली राहत होता. या तणावातून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने तो मंगळवारी (ता. 2) पत्रकार भवन ते संभाजी तलावादरम्यान रेल्वे रूळ परिसरात थांबला. त्याला दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी विचारले आणि तो आत्महत्या करण्यासाठाल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणून घरच्यांच्या ताब्यात दिले.

त्या दोघांना आयुक्‍तांनी जाहीर केले बक्षिस 
सहायक पोलिस आयुक्‍त कमलाकर ताकवले यांच्या वाहनाचे चालक पोलिस शिपाई सरफराज शेख व ऑपरेटर शहाजी मंडले यांनी प्रसंगावधान साधून व तत्परता दाखवून आत्महत्येसाठी निघालेल्या त्या तरुणाचा जीव वाचविला. या कामाचे कौतूक करीत पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी त्या दोघांनाही बक्षिस जाहीर केले आहे. 

सहायक पोलिस आयुक्‍तांचे चालक व कार्यालयातील ऑपरेटर हे पत्रकार भवनमार्गे संभाजी तलावाजवळून विजयपूर रोडकडे निघाले होते. त्यावेळी त्यांना रेल्वे पुलावर एक व्यक्‍ती संशयितरित्या उभारल्याचे दिसले. त्यांनी त्याला हटकले, परंतु त्याने स्पष्टपणे उत्तर दिले नाही. त्याला पुलावरुन खाली उतरविले आणि सहानुभूतिपूर्वक विचारणा केली. त्यावेळी त्याने हकीकत सांगितली आणि त्या दोघांना धक्‍काच बसला. आत्महत्येसाठी त्याठिकाणी आलेल्या तरुणाला त्यांनी सदर बझार पोलिस ठाण्याच्या बीट मार्शलकडे सोपविले. त्यानंतर ते दोघेही घरी निघून गेले. सदर बझार पोलिसांनी त्याची चौकशी करुन वडिल व अन्य नातेवाईकांकडे सोपविले. त्याची पत्नी असून त्याला वडिल आहेत. त्यांनी पोलिसांचे आभार मानले. दरम्यान, त्या तरुणाला दोन लहान मुले असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो हमाली करतो. आईच्या अकाली निधानामुळे तो पूर्णपणे खचला होता. त्या तणावातूनच तो आत्महत्या करायला निघाल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com