esakal | स्मार्ट सिटी 'सीईओ'चा महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिला राजीनामा 
sakal

बोलून बातमी शोधा

18683780_RxU2aUhrUZufOUzFHIueFJGHxiX2gol63uy2gNs1YmQ - Copy.jpg

शहरातील कामांची स्थिती 

 • उजनी ते सोलापूर पाईपलाईन : 405 कोटी 
 • पाणी पुरवठा, मलनिस्सारण प्रक्रिया : 175 कोटी 
 • प्राधान्यक्रमातील रस्ते : 99 कोटी 
 • एलईडी स्ट्रीट लाईटसाठी पायाभूत सुविधा : 17 कोटी 
 • सिध्देश्‍वर तलाव परिसर सुशोभिकरण : 13.83 कोटी 
 • सिध्देश्‍वर तलाव सुशोभिकरण : 2.91 कोटी 
 • स्ट्रीट बझार : 3.05 कोटी 
 • लक्ष्मी मार्केट नुतनीकरण : 8.77 कोटी 
 • इंदिरा गांधी स्टेडिअमचा विकास : 7.65 कोटी 
 • शासकीय इमारतींवर सोलर बसवणे : 3.02 कोटी 
 • ई- टॉयलेट : 3.58 कोटी 
 • डस्ट बिन खरेदी : 95 लाख 

स्मार्ट सिटी 'सीईओ'चा महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिला राजीनामा 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्रिंबक ढेंगळे- पाटील यांची शासनाकडून निवड झाली आहे. त्यामुळे यापूर्वी महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला. 

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्याच्या हेतूने सोमवारी (ता. 21) संचालक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर, स्मार्ट सिटीचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंब ढेंगळे- पाटील, सभागृह नेता श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते महेश कोठे, संचालक नरेंद्र काटीकर, चंद्रशेखर पाटील, मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, उजनी ते सोलापूर जलवाहिनी टाकणे, एबीडी एरियात पाणी पुरवठा व मलनिस्सारण प्रक्रियेत सुधारणा करणे, शहरातील धुळीचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने दहा किलोमीटरचे सिमेंट क्रॉंकिटचे रस्ते तयार करणे, एइईडी स्ट्रीट लाईटच्या पार्श्‍वभूमीवर पायाभूत सुविधा तयार करणे, सिध्देश्‍वर तलाव परिसर विकसीत करणे, स्ट्रीट बझार उभारणे, लक्ष्मी मार्केटचे नुतनीकरण करणे, इंदिरा गांधी स्टेडिअमचा विकास करणे, शासकीय इमारतींवर रुफ टॉप सोलर बसविणे, डिजिटल कंन्टेंट, क्रिएशन व व्यवस्थापनाचे काम पूर्ण करणे, ई टॉयलेट, डस्टबिन खरेदी या कामांचा आढावा घेण्यात आला. 

शहरातील कामांची स्थिती 

 • उजनी ते सोलापूर पाईपलाईन : 405 कोटी 
 • पाणी पुरवठा, मलनिस्सारण प्रक्रिया : 175 कोटी 
 • प्राधान्यक्रमातील रस्ते : 99 कोटी 
 • एलईडी स्ट्रीट लाईटसाठी पायाभूत सुविधा : 17 कोटी 
 • सिध्देश्‍वर तलाव परिसर सुशोभिकरण : 13.83 कोटी 
 • सिध्देश्‍वर तलाव सुशोभिकरण : 2.91 कोटी 
 • स्ट्रीट बझार : 3.05 कोटी 
 • लक्ष्मी मार्केट नुतनीकरण : 8.77 कोटी 
 • इंदिरा गांधी स्टेडिअमचा विकास : 7.65 कोटी 
 • शासकीय इमारतींवर सोलर बसवणे : 3.02 कोटी 
 • ई- टॉयलेट : 3.58 कोटी 
 • डस्ट बिन खरेदी : 95 लाख