महापालिकेचा नवा विरोधी पक्षनेता ठरला ! विभागीय आयुक्‍तांच्या सुनावणीनंतर निर्णय 

तात्या लांडगे
Sunday, 8 November 2020

सोलापूर : महापालिकेचा विरोधी पक्षनेता निवडीसाठी शिवसेना पदाधिकारी, नगरसेवकांची लवरकच बैठक होणार आहे. यापूर्वी ठरल्याप्रमाणे नगरसेवक अमोल शिंदे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपविली जाणार हे निश्‍चित झाले आहे. मात्र, महेश कोठे यांनी विधानसभेपूर्वी 19 नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन करण्यास विभागीय आयुक्‍तांकडे मान्यता मागितली होती. त्याचा निर्णय 10 नोव्हेंबरला अपेक्षित होता. परंतु, तो पुढे गेल्याने आता विरोधी पक्षनेत्याची निवडही लांबणीवर पडली आहे.

महापालिकेची जबाबदारी कोठेंवरच 
महापालिकेत कोणत्या समितीवर कोणाला घ्यायचे, कोणाला स्विकृत नगरसेवक म्हणून घ्यायचे, विरोधी पक्षनेते पद सोडून त्याठिकाणी नव्या कोणाला संधी द्यायची, याची संपूर्ण जबाबदारी महेश कोठे यांच्यावर सोपविली आहे. महेश कोठे यांनी महापालिकेत शिवसेनेची ताकद दाखवून दिली असून त्यांच्या सहकार्यातून आम्ही निश्‍चितपणे शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडवू, असे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार कोठे यांच्याकडेच असून तेच निर्णय घेतली, असेही बरडे म्हणाले.

महापालिकेत प्रारंभी भाजप व शिवसेनेची सत्ता होती. त्यानंतर राज्यातील सत्ता समिकरणे बदलली. सध्या शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडी विरोधी भूमिकेत आहे. आतापर्यंत दोन महापौर झाले, तर तीन सभागृह नेते झाले. मात्र, विरोधी पक्षनेते साडेतीन वर्षांपासून अधिक काळ एकच आहेत. तत्पूर्वी, पक्षाच्या बैठकीत विद्यमान महेश कोठे यांनी शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांना महापालिकेची गाडी मिळवून देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आपण दिलेला शब्द पाळणारच, असे कोठे यांनी वारंवार स्पष्ट केले. मात्र, अमोल शिंदे यांना गाडी अद्याप मिळाली नाही. या पार्श्‍वभूमीवर पक्षातीलच परंतु, कोठे यांच्याविरुध्द भूमिका घेतलेले नगरसेवक म्हणाले, विरोधी पक्षनेता हा स्मार्ट सिटीचा संचालक असल्याने ते पदभार सोडायला तयार नाहीत. दुसरीकडे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर यांनी कोठे यांच्याकडेच बोट दाखविले आहे. मात्र, विरोधी पक्षनेत्यांची निवड झाल्यानंतर विभागीय आयुक्‍तांच्या निर्णयानंतर शिंदे यांना अडचण येऊ नये, या हेतूने कोठे यांनी सावध भूमिका घेतली आहे. विभागीय आयुक्‍तांकडून निर्णय प्राप्त झाल्यानंतर ही निवड केली जाणार असल्याची चर्चा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation the new Leader of Opposition Amol Shinde ! Decision after hearing of Divisional Commissioners