अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या मुलाचा केला आई व तिच्या प्रियकराने खून ! आईला अटक, प्रियकर फरार

In the murder case of a youth at Paritewadi in Madha taluka, the mother and her boyfriend have brutally murdered the child as the child has become an obstacle to an immoral relationship.
In the murder case of a youth at Paritewadi in Madha taluka, the mother and her boyfriend have brutally murdered the child as the child has become an obstacle to an immoral relationship.
Updated on

टेंभुर्णी (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील परितेवाडी येथील तरूणाच्या खून प्रकरणामध्ये अनैतिक संबंधास मुलगा अडथळा ठरू लागल्याने आई व तिच्या प्रियकराने मिळून मुलाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. या खूनप्रकरणी मुलाच्या आईला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. माढा न्यायालयासमोर हजर केले असता मंगळवार (ता.29) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश माढा न्यायालयाच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तिचा प्रियकर मात्र फरारी आहे. 

सिध्देश्वर सुभाष जाधव ( वय-21 ) असे खून झालेल्या तरूणाचे नाव असून त्याची आई मुक्ताबाई सुभाष जाधव (वय- 45 रा. परितेवाडी ता. माढा) हिला पोलिसांनी अटक केली असून तिचा प्रियकर तात्यासाहेब महादेव कदम ( रा. परितेवाडी ता. माढा) हा फरार आहे. 

या विषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, परितेवाडी गावच्या हद्दीतील माळावर तरूणाचा निर्घृण खून केल्याची माहिती परितेवाडीचे पोलिस पाटील जिंदास बाळू हराळे यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यास कळविली. टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शितोळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले, पोलिस हवालदार सलीम पठाण, पोलीस नाईक संजय भानवसे, बिरूदेव हजारे हे तातडीने घटनास्थळी आले. दरम्यान करमाळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी घटना स्थळास भेट दिली. घटनास्थळी रक्त सांडल्याचे दिसले नाही. त्यामुळे सिध्देश्वर जाधव याचा इतर ठिकाणी खून करून नंतर मृतदेह माळावर आणून टाकल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मयत सिध्देश्वर जाधव याच्या घरी पोलिस गेले असता घरासमोर सारवल्याचे तसेच तेथे रक्ताचे थेंब पडल्याचे दिसले. घराच्या बाहेर अंथरून पांघरून जाळल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने मयत सिध्देश्वर जाधव याची आई मुक्ताबाई व लहान भाऊ बालाजी जाधव (वय- 19) यास चौकशीसाठी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात आणले.

ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी बालाजी जाधव याने आई मुक्ताबाई व तात्या कदम यांच्या अनैतिक संबंधामध्ये भाऊ सिध्देश्वर हा अडकाठी ठरत होता. तात्या कदम याच्या मेव्हुण्याकडील आमची जमीन आम्ही परत मागत होतो. जमीन परत न दिल्यास तात्या कदम यास मारहाण करणार आहोत याची कल्पना आईने तात्या कदम यांना दिली होती. त्यामुळे आई मुक्ताबाई व तात्या कदम या दोघांनी मिळून भाऊ सिध्देश्वर यास घरासमोर तो झोपलेल्या ठिकाणी मारून त्याचे प्रेत माळरानावरील चारीत नेऊन टाकले आहे असे बालाजी जाधव याने पोलिसांना सांगितले. मुक्ताबाई हिच्याकडे चौकशी केली असता तिने व प्रियकराने मिळून खून केला असल्याची कबुली पोलिसांना दिली. शनिवारी सकाळी आरोपी मुक्ताबाई जाधव हिला अटक केली. दुपारी माढा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिरी एस. एस. सय्यद यांनी मंगळवार ( ता. 29) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणी पोलिस पाटील जिंदास हराळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शितोळे हे करीत आहेत. 

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न 

शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिध्देश्वर जाधव याची आई मुक्ताबाई हिने टेंभुर्णी पोलिस ठाण्यात येऊन रात्रीपासून मुलगा सिध्देश्वर हा गायब असून त्याचे दोन मित्र त्यास रात्री घरातून घेऊन गेले आहेत. माझ्या मुलाचा शोध घ्या असा कांगावा करून आरोपी मुक्ताबाई जाधव हिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. 

सिध्देश्वर जाधव या तरूणाचा खून नेमका व कोणत्या कारणासाठी केला याचे गुढ उकलणे हे पोलिसांसमोर आव्हान असल्याने करमाळा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे हे रात्री उशीरापर्यंत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात तळ ठोकून बसले होते. त्यांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवून खुनाचे गुढ उकलण्यात यश मिळविले. 

सिध्देश्वर जाधव याच्या खून प्रकरणी त्याची आरोपी आई मुक्ताबाई जाधव हिला अटक केली असून गुन्ह्यातील दुसरा आरोपी तिचा प्रियकर तात्यासाहेब महादेव कदम हा फरारी आहे. त्याच्या शोधासाठी टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक रवाना केले असून त्यास लवकरच अटक करण्यात येईल. 
- डॉ. विशाल हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com