esakal | मुळेगाव परिसरात दारुच्या नशेत तरुणाचा खून ! संशयित आरोपी 12 तासांत जेरबंद

बोलून बातमी शोधा

0Crime_Sakal_0.jpg}

सीसीटिव्हीमुळे लागला सुगावा
सुरेश बबन गायकवाड आणि रवी रणखांबे हे दोघेही खुनाच्या काही तास अगोदर एकत्र होते हे पोलिसांना सीसीटिव्हीतून आढळले. त्यानंतर रवी रणखांबेला अटक केली असून खूनाचे नेमके कारण काय, याची चौकशी केली जात आहे.

मुळेगाव परिसरात दारुच्या नशेत तरुणाचा खून ! संशयित आरोपी 12 तासांत जेरबंद
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत तरूणाला दगडावर आपटून खून करणाऱ्या आरोपीला सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या 12 तासांतच अटक केली. ही घटना बुधवारी (ता. 3) पहाटेच्या सुमारास मुळेगाव परिसरात घडली होती.

सीसीटिव्हीमुळे लागला सुगावा
सुरेश बबन गायकवाड आणि रवी रणखांबे हे दोघेही खुनाच्या काही तास अगोदर एकत्र होते हे पोलिसांना सीसीटिव्हीतून आढळले. त्यानंतर रवी रणखांबेला अटक केली असून खूनाचे नेमके कारण काय, याची चौकशी केली जात आहे.

मुळेगाव परिसरातील भिमनगरातील सुरेश बबन गायकवाड (वय 26) असे मृताचे नाव आहे. तर रवि बाबु रणखांबे (वय 37, रा. भिमनगर, ता. दक्षिण सोलापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला बुधवार सकाळी मुळेगांव येथे एका युवकाचा शेतात मृतदेह पडल्याची खबर मिळाली. त्यावरून उपविभागिय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे, श्री. गायकवाड, नासीर शेख, पोलीस हवालदार सुनिल बनसोडे, फय्याज बागवान, अनिस शेख, शशी कोळेकर, देवा सोलंकर, अशोक खवतोडे, शंकर मुजगोंड, राजु इंगळे, रवि हटकळे आदी पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. अधिकाऱ्यांनी त्याठिकाणच्या परिस्थितीची पाहणी केली. एक तरूण त्याच्या डोक्‍याला मोठी जखम होऊन मरण पावला होता. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक जगताप यांनी तपासाची चक्रे फिरवली. रामचंद्र बिराजदार यांच्या शेतात हा मृतदेह आढळून आल्याने शेताकडे येणाऱ्या रस्त्यावरील सीसीटिव्ही कॅमेरे पडताळण्यात आले. त्यामध्ये रात्रीच्या सुमारास दोघेजण जात असल्याचे पोलिसांना दिसले. त्यातील एकजण सुरेश गायकवाड होता तर दुसरा व्यक्‍ती गायब होता. त्या दुसऱ्या तरुणाचा शोध घेतल्यानंतर तो रवि रणखांबे असल्याचे पोलिसांना समजले आणि त्यानेच गायकवाड याला ठार मारल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली असून काही तासांत संशयित आरोपीला पकडल्याने पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तालुका पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतूक केले.