esakal | पाच वर्षांपासून एकट्या राहणाऱ्या महिलेचा खून ! चौकशीसाठी पोलिसांची पथके
sakal

बोलून बातमी शोधा

0Crime_Story_0.jpg

शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल बरीच माहिती
होटगी रोडवरील महालक्ष्मी नगरातील 40 वर्षीय महिलेचा खून झाल्याचा अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून त्यानंतर बरीच माहिती समोर येईल. महिलेचा खून नेमका कोणत्या कारणावरुन झाला, याचा सखोल तपास सुरु असल्याची माहिती विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

पाच वर्षांपासून एकट्या राहणाऱ्या महिलेचा खून ! चौकशीसाठी पोलिसांची पथके

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : पतीच्या मृत्यूनंतर होटगी रोडवरील कुमठा नाका परिसरातील महालक्ष्मी नगरात राहणाऱ्या लक्ष्मीबाई शिवाजी माने (वय- 40) यांचा गळा दाबून खून झाल्याची प्राथमिक माहिती विजापूर नाका पोलिसांना मिळाली आहे. तत्पूर्वी, मयताच्या नणंद कविता हणमंतु भोसले (रा. गोसकी नगर, कुमठा नाका) यांनी लक्ष्मीबाई यांचा खून झाल्याची फिर्याद पोलिसांत नोंदविली आहे.

शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल बरीच माहिती
होटगी रोडवरील महालक्ष्मी नगरातील 40 वर्षीय महिलेचा खून झाल्याचा अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून त्यानंतर बरीच माहिती समोर येईल. महिलेचा खून नेमका कोणत्या कारणावरुन झाला, याचा सखोल तपास सुरु असल्याची माहिती विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

मयत लक्ष्मीबाई यांचे पती शिवाजी माने यांचा सहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांना दोन मुली आणि एका मुलगा असून त्यातील एका मुलीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. तर एक मुलगी कर्नाटकात राहत असून मयताचा मुलगाही बहिणीकडेच कर्नाटकात राहायला आहे. मागील पाच वर्षांपासून मयत लक्ष्मीबाई या एकट्याच राहत होत्या, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, नणंद लक्ष्मीबाई यांचा घरात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली. त्यावेळी नणंद लक्ष्मीबाई घरात उताणे आवस्थेत निपचित पडली होती. पायाच्या नखातून रक्‍त येत होते. चेहऱ्यावर काळपट तर गळ्यावरही काळपट व्रण होते, अशी माहिती कविता भोसले यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर विजापूर नाका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. मृताचा स्वॅब घेतला असून त्यांचा कोरोना रिपोर्ट आलेला नाही. तर शवविच्छेदनही झाले नसल्याची माहिती विजापूर नाका पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी तीन पथके तयार करुन संशयितांच्या चौकशीसाठी रवाना केली असून या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक शितलकुमार कोल्हाळ हे करीत आहेत.