बॅंका अधिकाऱ्याने काढली परस्पर रक्कम; सांगोला तालुक्‍यातील घटना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जून 2020

न्यायालयाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश 
प्रभाकर फोंडे यांनी सांगोला न्यायालयात ऍड. विशालदीप बाबर यांच्यामार्फत बॅंक अधिकाऱ्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाने संबंधित शाखाधिकाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील सोनंद गावातील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या सोनंद शाखेच्या शाखा अधिकाऱ्याने डोंगरगाव (ता. सांगोला) येथील प्रभाकर महादेव फोंडे यांच्या बचत खात्यांतील 60 हजार रुपये परस्पर काढले म्हणून सांगोला न्यायालयाने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सांगोला पोलिसांना दिले आहेत. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, डोंगरगाव (ता. सांगोला) येथील शेतकरी प्रभाकर महादेव फोंडे यांनी त्यांच्या व पत्नीच्या नावे बचत खाते सोनंद येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखेत काढलेले होते. हे खाते संबंधित शाखा व्यवस्थापकाने दुसऱ्या व्यक्तीच्या आधारला लिंक करून फोंडे यांच्या खात्यातून 13 ते 19 जून 2019 या कालावधीत 10-10 हजार रुपयांप्रमाणे 60 हजार रुपये फोंडे यांच्या परस्पर काढलेले होते. महिन्याभरानंतर सदरची बाब फोंडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बॅंकेत संपर्क साधला असता बॅंका अधिकाऱ्यांनी त्यांची काहीही दखल घेतली नव्हती. त्यामुळे संबंधित प्रभाकर फोंडे यांनी सांगोला न्यायालयात ऍड. विशालदीप बाबर यांच्यामार्फत बॅंक अधिकाऱ्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाने संबंधित शाखाधिकाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 
दरम्यान, तालुक्‍यातील घेरडी बॅंक घोटाळा ताजा असतानाच राष्ट्रीयीकृत सेंट्रल बॅंक ऑफ इंडियात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. यामुळे खातेदारांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mutual amount withdrawn by bank officer incident in Sangola taluka