esakal | आयपीएल सट्ट्याचे नागपूर कनेक्‍शन ! पोलिसांनी तिघांना केली अटक; 17 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
sakal

बोलून बातमी शोधा

satta-cricket_201809138895.jpg

ठळक बाबी... 

  • अवंती नगरातील पर्ल हाईट्‌समधील आयपीएल सट्टा कनेक्‍शन कर्नाटकानंतर आता नागपुरातही 
  • नागपूरहून तीन संशयित आरोपींना गुन्हे शोखेने घेतले ताब्यात 
  • संशयित आरोपींकडून पोलिसांनी 53 लाख 15 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त 
  • अमित उर्फ रिंकू गोविंदप्रसाद अग्रवाल, सुनिल गंगाशहा शर्मा, राहूल प्रल्हाद काळेला 17 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
  • वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई 

आयपीएल सट्ट्याचे नागपूर कनेक्‍शन ! पोलिसांनी तिघांना केली अटक; 17 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील अवंती नगर येथील पर्ल हाईट्‌स येथे 6 नोव्हेंबरला पोलिसांनी छापा टाकला. तेथून दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल क्रिकेट सट्ट्याचे कनेक्‍शन कर्नाटकानंतर आता नागपुरातही असल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूरहून तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने 17 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

ठळक बाबी... 

  • अवंती नगरातील पर्ल हाईट्‌समधील आयपीएल सट्टा कनेक्‍शन कर्नाटकानंतर आता नागपुरातही 
  • नागपूरहून तीन संशयित आरोपींना गुन्हे शोखेने घेतले ताब्यात 
  • संशयित आरोपींकडून पोलिसांनी 53 लाख 15 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त 
  • अमित उर्फ रिंकू गोविंदप्रसाद अग्रवाल, सुनिल गंगाशहा शर्मा, राहूल प्रल्हाद काळेला 17 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
  • वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई 

आयपीएलचा सामना सुरु होण्यापूर्वी टॉस कोणता संघ जिंकेल, यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत होता. तर सामना सुरु झाल्यानंतर 6, 10, 15 आणि 20 ओव्हरपर्यंत किती धावा होतील, यावरही सट्टा चालायचा. पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अवंती नगरात छापा टाकला. त्यानंतर संशयित आरोपी चेतन रामचंद्र वन्नाल, विग्नेश नागनाथ गाजूल यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कर्नाटकातून काहींना अटक करुन मुद्देमाल जप्त केला. तर आता नागपुरातून तिघांना पकडले असून त्यांच्याकडून 53 लाख 15 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक अजित कुंभार, सचिन बंडगर, पोलिस उपनिरीक्षक संदिप शिंदे, पोलिस हवालदार औदुंबर आटोळे, जयसिंग भोई, संजय साळुंखे, सिध्दाराम देशमुख, स्वप्निल कसगावडे, दत्तात्रय कोळेकर, विजय निंबाळकर यांच्या पथकाने केली.