esakal | नंदकुमार मुस्तारे यांचे कार्य दीर्घकाळ स्मरणात राहील : धर्मराज काडादी 
sakal

बोलून बातमी शोधा

Nandkumar Mustare.jpg

नंदकुमार मुस्तारे हे एक निर्भिड व परखड मते मांडणारे हसतमुख व्यक्तिमत्त्व असून त्यांनी अतिशय मोठा मित्र परिवार जोपासला होता.

नंदकुमार मुस्तारे यांचे कार्य दीर्घकाळ स्मरणात राहील : धर्मराज काडादी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोलापूर : नंदकुमार मुस्तारे यांची महाराष्ट्र वीरशैव सभेच्या शहराध्यक्ष कारकिर्द तसेच चार दशकाहूनही अधिक काळ सामाजिक चळवळीत सतत कृतीशीलता ठेवून त्यांनी केलेले कार्य हे सोलापूरच्या समाजजीवनात दीर्घकाळ स्मरणात राहील, असे मत सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र वीरशैव सभेचे शहराध्यक्ष नंदकुमार मुस्तारे यांच्या शोकसभेत ते बोलत होते. प्रारंभी महाराष्ट्र वीरशैव सभेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी सिध्देश्वर बॅकेचे चेअरमन प्रकाश वाले, महाराष्ट्र वीरशैव सभेचे कार्याध्यक्ष जगदीश पाटील, प्रदेश सहचिटणीस नरेंद्र गंभिरे, बसवराज बगले, अशोक करजोळे, युवा आघाडीचे राज पाटील, नगरसेवक विनोद भोसले, नाट्य परिषदेचे विजय साळुंखे, कॉंग्रेसचे सुधीर खरटमल, विजय शाबादी, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. पुष्पा गुंगे, कसबा गणपती प्रतिष्ठानचे मल्लिनाथ खुने, विजय शाबादे, रेवण आवजे, राजशेखर रोडगीकर, भारतीय किसान संघाचे रावसाहेब शहाणे, ऍड. मल्लिनाथ शाबादे, श्रीकांत हावळगी, अककलकोटचे दिलीप सिध्दे आदींनी नंदकुमार मुस्तारे यांच्या अकाली निधनाबाबत शोक प्रकट करून त्यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. 
माजी महापौर मनोहरपंत सपाटे यांनी महापालिकेच्या वतीने लता मंगेशकर यांना मानपत्र देण्याच्या कार्यक्रमासाठी नंदकुमार मुस्तारे यांनी दिलेल्या योगदानाची आठवण सांगितली. 

माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या मनोगतात नंदकुमार मुस्तारे हे एक निर्भिड व परखड मते मांडणारे हसतमुख व्यक्तिमत्त्व असून त्यांनी अतिशय मोठा मित्र परिवार जोपासला होता व त्याचप्रमाणे देशमुख कुटुंबियांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध होते, असे प्रतिपादन केले. 

याप्रसंगी महाराष्ट्र वीरशैव सभेचे कोषाध्यक्ष प्रकाश हत्ती, मनिष घोंगडे, सकलेश लिगाडे, सिध्देश्वर देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब भोगडे, शिवकुमार पाटील, मानकरी राजशेखर हिरेहब्बू, ,प्रकाश बिराजदार, प्रशांत बडवे, गुरु वठारे, नागनाथ मेंगाणे, गणेश चिंचोळी, रामू तिवाडी, नागनाथ बेलुरे, सचिन कुलकर्णी, राजशेखर चोळ्ळे व अनेक मान्यवर उपस्थित होते. 

संपादन : अरविंद मोटे 

go to top