
सोलापूर, ः नेहमीचा नात्यांचा गोतावळा व नातेवाईकाच्या कार्यक्रमात रमणाऱ्यांना आता कोरोनाच्या संकटात केवळ शेजाऱ्याचाच आधार मोठा वाटू लागला आहे. या संकटाने शेजाऱ्याची माणुसकीच्या मदत प्रत्येकाला नवा धडा देणारी ठरली आहे. लॉकडाऊनमध्ये नातेवाईक केवळ फोन कॉलवर तर शेजाऱ्याची सगळी मदत मिळत असल्याचा अनुभव येऊ लागला आहे.
हेही वाचाः घरात अडकलेल्या वयोवृध्दांना देणार जीवनावश्यक वस्तू
कोरोना संकट व लॉकडाऊनमुळे अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले. कुणाच्या घरी जायचे नाही म्हणजे नातेवाईकाकडे ये-जा बंदच झाली आहे. त्यामुळे नातेवाईकांना केवळ फोन कॉलवर त्यांची खुशाली विचारली जात आहे. अगदी बाहेरगावी मुले असली तरी त्यांना काळजी घेण्याच्या सुचना देण्याशिवाय इतर कोणतीही गोष्ट करता येत नाही. मुलांची ही अवस्था तर इतर नातेवाईकाच्या बाबतीत तर हाच नियम लागु झाला आहे.
हेही वाचा ः आईबाबा चिंता नसावी आम्ही सर्व व्यवस्थीत आहोत
ज्यांची मुले परदेशात आहे त्या मुलांना देखील तीकडे इतर भारतीयांची मदत घ्यावी लागत आहे. या मुलांचे पालक मुलांच्या मित्राशी बोलून काळजी घेण्याच्या सुचना देत आहेत. लग्न व इतर सोहळे बंद झाल्याने आता नातेवाईकाकडे लॉकडाऊनमध्ये जाण्याची सोय राहीली नाही. मात्र या स्थितीत शेजाऱ्यांचा आधार मोलाचा वाटू लागला आहे. छोटी मुले घराबाहेर पडली तर शेजारी लगेचच त्यांना आवरण्याचे सांगतात. भाजीपाला आला तर शेजाऱ्यांना आवाज देऊन भाजी घेण्याची सुचना दिली जाते. कॉलनीमध्ये सर्व रहीवाशी या संकटाने एकत्र येवून स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कुणी आजारी असेल तर कॉलनीतील शेजारी राहणारे डॉक्टर औषधी लिहून देतात. काही नागरिकांनी आता कॉलनीतील लोकांचे व्हॉटसऍपचे ग्रुप देखील केले आहेत. कुणाकडे सॅनीटायझर संपले तर कुणाला घराबाहेर पडायचे शेजाऱ्यांना विचारून कामे केली जात आहे. एकच जण बाहेर पडणार असेल तर त्यालाच शेजाऱ्यांच्या काही वस्तु आणून देणे शक्य होत आहे.
या प्रकारच्या अनेक प्रसंगातून शेजाऱ्यांची मदत कीती मोठी आहे याचा अनुभव रहीवाशांना आला आहे. एकट्याने घरासमोर स्वच्छता करून उपयोगी नाही तर गल्लीतील सर्वच शेजारी मीळून स्वच्छता ठेवली जात आहे.
शेजाऱ्यामुळे सर्व काही शक्य
कोरोनाच्या संकटात सर्व शेजाऱ्यांनी एकत्र येवून कॉलनीची स्वच्छता ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच डॉक्टर असो की घरातील अडचणी यामध्ये शेजाऱ्याशी बोलून प्रश्न सोडवता येत आहेत- संजय देशमाने, शिवगंगानगर सोलापूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.