कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना करमाळ्यात नवाच वाद 

A new controversy in Karmala as the prevalence of corona increases
A new controversy in Karmala as the prevalence of corona increases
Updated on

करमाळा (जि. सोलापूर) : कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन समितीतील सदस्यांना त्यांच्या गावात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र आपत्ती व्यवस्थापन समितीतील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक संबंधित गावात राहात नाहीत. त्यामुळे कोणत्या गावात हे सदस्य मुक्कामी राहतात आणि कोणत्या गावात नाहीत, याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी मागवली आहे. तर करमाळा तालुक्‍यात आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून कार्यरत असताना पोलिस कर्मचाऱ्यांकडून नाहक त्रास होत असल्याची तक्रारीचे निवेदन ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक संघटनेने तहसीलदार समीर माने यांच्याकडे केली आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनातील वाद चव्हाट्यावर आला आहे. 

याबाबत पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, करमाळा तालुक्‍यामध्ये दररोज सरासरी शंभर लोक बाहेरच्या जिल्ह्यातून वास्तव्यास येत आहेत. परंतू ग्रामआपत्ती व्यवस्थापन समिती याबाबत माहिती कळवत नाही. ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीमधील सदस्य तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व इतर सदस्य यांना नेमून दिलेल्या गावात मुक्कामाला थांबायचे आहे. असा शासनाचा आदेशात असताना समितीचे सदस्य गावात मुक्कामी राहात नाहीत. कोणत्या गावात ही सदस्य मुक्कामी राहतात व कोणत्या गावात राहत नाहीत, याची माहिती संबंधित बीटच्या हवालदारांनी शुक्रवार ता. 24पर्यंत तात्काळ कार्यालय सादर करावा, असे पत्रात म्हटले आहे. 
तर पोलिसांकडून आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या गाड्या आडवून जप्त केल्या जात असल्याचा आरोप करत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक संघटनेच्या अध्यक्ष व सचिवांच्या सहीने करमाळा पोलिसांच्या विरोधात निवेदन दिले आहे. याबाबत कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की 20 मार्चपासून करून प्रादुर्भाव काळात प्रत्येक गावात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक व सर्व आपत्कालीन समितीचे सदस्य कार्यरत असून गावात सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत. संबंधित कामकाजाची माहिती वेळोवेळी आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्याकडे दिली जात आहे. हे काम करत असताना पोलिस कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन समितीतील सदस्यांच्या गाडया अडवून दंडात्मक कारवाई करण्यासाठी करत नाहक त्रास देत असून नैसर्गिक आपत्ती काळात जिवाची परवा न करता काम करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना पोलिसांनी सहकार्य केले पाहिजे. आतापर्यंत पोलिसांनी नाहक त्रास देऊन जप्त केलेल्या गाड्या परत कराव्यात, अशी मागणी या संघटनेच्यावतीने करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com