esakal | अनलॉकचे नवे आदेश ! उद्याने, आठवडा बाजार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

hqdefault.jpg

ठळक बाबी... 

  • राष्ट्रीय कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, औद्योगिक कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांना परवानगी 
  • राष्ट्रीय उद्योजक संस्था, लघू उद्योग विकास संस्था प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरु करण्यास मान्यता 
  • पीएचडी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा विज्ञान व तंत्रज्ञान विभागातील प्रायोगिक शिक्षणास परवानगी 
  • मनोरंजन, करमणूक हेतुसाठी उद्याने, सार्वजनिक मोकळ्या जागा सुरु करण्यास मंजुरी 
  • आठवडा बाजार, जनावरे बाजार सुरु करता येतील; आयुक्‍तांनी काढले नवे आदेश 

अनलॉकचे नवे आदेश ! उद्याने, आठवडा बाजार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना परवानगी

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : केंद्रासह राज्यातील लॉकडाउन आता टप्प्याटप्याने अनलॉक केला जात आहे. आज महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी नवे आदेश काढले. त्यानुसार शहरातील आठवडे बाजार, जनावरे बाजार, उद्याने, मोकळी मैदाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ठळक बाबी... 

  • राष्ट्रीय कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, औद्योगिक कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांना परवानगी 
  • राष्ट्रीय उद्योजक संस्था, लघू उद्योग विकास संस्था प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरु करण्यास मान्यता 
  • पीएचडी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा विज्ञान व तंत्रज्ञान विभागातील प्रायोगिक शिक्षणास परवानगी 
  • मनोरंजन, करमणूक हेतुसाठी उद्याने, सार्वजनिक मोकळ्या जागा सुरु करण्यास मंजुरी 
  • आठवडा बाजार, जनावरे बाजार सुरु करता येतील; आयुक्‍तांनी काढले नवे आदेश 

शहरातील कोरोनाचा संसर्ग आता कमी होऊ लागला आहे. दुसरीकडे नागरिकांसह संबंधित आस्थापना चालकांना नियम व अटींचे बंधन घालून नव्याने परवानगी देण्यात आली आहे. दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असून पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानासमोर असू नयेत, असेही आयुक्‍तांनी आदेशात नमूद केले आहे. तसेच शाळा 31 ऑक्‍टोबरपर्यंत तुर्तास बंदच राहतील, प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य शाळांमधील 50 टक्‍के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन व दूरध्वनीवरुन शैक्षणिक कामकाज पाहण्यास परावनगी असेल, असेही आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे. लग्न समारंभासाठी 50 तर अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्‍तींना परवानगी असेल, असे आयुक्‍तांनी आदेशाद्वारे बजावले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यास व विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.