बाणेगाव, जेऊरवाडी, बोरगाव येथे नव्याने सापडले कोरोनाबाधित रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

तालुकानिहाय बाधितांची संख्या 
अक्कलकोट-69, बार्शी-51, करमाळा-1, माढा-8, माळशिरस-5, मंगळवेढा-0, मोहोळ-21, उत्तर सोलापूर-28, पंढरपूर-16, सांगोला-3, दक्षिण सोलापूर-159, एकूण-361. 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना आपले पाय खंबीरपणे रोवू लागला आहे. उत्तर सोलापूर तालुक्‍यात तिऱ्हे, मार्डी, पाकणी या गावांबरोबरच कोरोनाने आता बाणेगाव येथेही शिरकाव केला आहे. त्याचबरोबर अक्कलकोट तालुक्‍यातील जेऊरवाडी व बोरगाव येथेही आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. 

जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज दिलेल्या अहलावामध्ये एकूण 17 जण कोरोनाबाधित असल्याचे म्हटले आहे. आज एकूण 129 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 112 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 361 एवढी झाली आहे. त्यामध्ये 226 पुरुष तर 135 स्त्रियांचा समावेश आहे. अद्यापही 34 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आज बाणेगाव येथील एक पुरुष, तिऱ्हे येथील दोन पुरुष, पंढरपूर येथील सात पुरुष, मोहोळ येथील तीन स्त्रिया एक पुरुष, अक्कलकोट तालुक्‍यातील जेऊरवाडी व बोरगाव (दे) येथील प्रत्येकी एक पुरुष आज कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आतापर्यंत 142 जण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णालयात अद्यापही 202 रुग्णावर उपचार सुरु आहेत. कोरोनाने आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. 

 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newly found coronary patients at Banegaon, Jeurwadi, Borgaon