आदेश नको, समन्वय साधा, सोलापूर कोरोनामुक्त करा 

आदेश नको, समन्वय साधा, सोलापूर कोरोनामुक्त करा 
Updated on


सोलापूर : शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिक व रुग्णालयांबाबत सध्या टीका टिप्पणी केली जात आहे. प्रशासनाकडूनही कारवाईचे आदेशामागे आदेश निघत आहेत. मात्र हे चुकीचे आहे. त्यापेक्षा प्रशासनातील अधिकारी आणि वैद्यकीय व्यावसायिक यांच्यात समन्वय साधून सोलापूर कोरोनामुक्त करण्याचा संकल्प केला पाहिजे, अशी अपेक्षात शहरातील डॉक्‍टरांनी व्यक्त केली आहे. 

विद्यमान आयुक्त पी. शिवशंकर आल्यापासून महापालिका प्रशासन व वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये काही प्रमाणात समन्वय साधला गेला आहे. त्यामुळे सकारात्मक बदलही दिसत असल्याचा दावा काही डॉक्‍टरांनी केला. आम्हीही सोलापूरकरच आहोत, आपले सोलापूर कोरोनामुक्त व्हावे असे कोणाला वाटणार नाही? मात्र शहरातील रुग्णालयांबाबत विनाकारण गैरसमज पसरवले जात आहेत. हा प्रकार थांबविणे गरजेचे आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, आयएमए व प्रायव्हेट डॉक्‍टर्स असोसिएशनचे पदाधिकारी यांची संयुक्त समिती नेमून समन्वय साधला गेला तर लवकरच शहर कोरोनामुक्त होईल, मात्र त्यासाठी सर्वांच्या ईच्छाशक्तीची गरज आहे, असाही दावा या डॉक्‍टरांनी केला. 

गेले काही दिवसांत वृत्तपत्रातून, इलेक्ट्रॉनिक मीडियातून, सोशल मीडिया मधून खासगी डॉक्टर्स व हॉस्पिटल्सवर टीका करणे ही एक फॅशनबनत चालली आहे. या स्पर्धेत शासकीय रुग्णालयातील उच्चशिक्षित डॉक्टरही सहभागी झाल्याने हीटीका म्हणजेच सत्य असल्याचा सर्वसामान्यांचा गैरसमज होतो आहे. खरे तर कोव्हिड आजाराच्या या महामारीत सरकारी व खासगी रुग्णालये असा भेदभाव करणे हे मुळात चुकीचे आहे. "हमें बीमारी से लढनाहैं, बीमार से नहीं " या टेलिफोन कॉलर ट्यूनमध्ये आता " हमें बीमारी से लढना है, डॉक्टरसे नहीं !" हे सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे. खरे तर ही कोणती स्पर्धाही नाही परंतु खाजगी रुग्णालयांवर उगाचच कोणी चिखलफेक करीत असेल तर त्यांना उत्तर देणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. वैद्यकीय अधिकार्यांनी पत्रक काढून सर्व वृत्तपत्रात प्रसिध्दिस देऊन सर्व खाजगी रुग्णालयांची व डॅाक्टरांची जाहीर बदनामी केली याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो व त्यांच्या या वर्तनावर वरीष्ठांनी कार्यालयीन चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी अशी विनंती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॅा. हरिश रायचूर व सोलापूर व सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशचे अध्यक्ष डॅा. सुदीप सारडा यांनी पत्रकाद्वारे केले आहे.  या पार्श्वभूमीवर शहरातील डॅाक्टरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

सोलापूर शहरातील खासगी रुग्णालयांना महापालिकेने नोटीसा दिल्या, पण त्या गैरसमजातून दिल्या. खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी अगोदरच दिली असती तर ही वेळ आली नसती. राज्यातील इतर शहरांमध्ये कोणत्या प्रकारे उपाय योजना केल्या आहेत त्याची माहिती घेतली असती तरी खूप फरक पडला असता. केवळ खासगी डॉक्‍टरांवर आरोप करून उपयोग नाही. 
- डॉ. आदर्श मेहता 

सर्व रुग्णालये त्यांच्या पद्धतीने योग्य काम करीत आहेत. सर्वचजण दोषी नसतात. गैरसमजातून नोटीसा दिल्या गेल्या आहेत. याबाबत प्रशासन आणि रुग्णालयाच्या प्रतिनिधीनी समन्वयाने धोरण निश्‍चित करता आले असते. खासगी डॉक्‍टरांना प्रशासनाने विश्‍वासात घेणे आवश्‍यक होते, तसे झाले नाही. त्यातून हा गोंधळ झाला आहे. 
- डॉ. प्रमोद धामणगावकर 

सरसकट सर्वांवर आरोप करण्याचा प्रकार चुकीचा आहे. कोरोनाचा संबंध फिजिशीयनशी आहे. इतर क्षेत्रातील डॉक्‍टरकडे रुग्ण गेला तर त्या ठिकाणी त्याच्यावर कोरोनाचे उपचार होणारच नाहीत. जिल्हा बंदी असल्याने रुग्णांची संख्या कमी झाली आहे, तशातच नोटीसा येऊ लागल्याने वैद्यकीय क्षेत्रातून निश्‍चित नाराजी व्यक्त होणार याबाबत कुणाचे दुमत असणार नाही. 
-डॉ. प्रशांत औरंगाबादकर 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com