"दक्षिण सोलापूर' चा यापुढील आमदार शिवसेनेचाच : पुरूषोत्तम बरडे यांचा विश्‍वास 

shivse bhavan
shivse bhavan
Updated on

 दक्षिण सोलापूर ः दक्षिण सोलापूर मतदार संघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांची सांगड घालत पक्षसंघटनेचे कार्य सुरू असल्याने यापुढील आमदार शिवसेनेचाच निवडून येईल, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी आज (ता.5) मतदारसंघातील पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीत व्यक्त केला. 

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी सकाळी जुनी मिल कंपाऊंड येथील शिवसेना कार्यालयात झाली. यावेळी श्री. बरडे बोलत होते. कोवीडच्या पार्श्वभूमीवर स्थगित केलेल्या बैठका आता घेतल्या जात आहेत. त्यातूनच या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, नूतन उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, भीमाशंकर म्हेत्रे, तालुकाप्रमुख योगीराज पाटील, तालुका संघटक गंगाराम चौगुले, माजी तालुकाप्रमुख रमेश नवले, बापू कोकरे, माजी नगरसेवक शैलेश अमणगी व महिला आघाडी तालुकाप्रमुख लता राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना पुरुषोत्तम बरडे म्हणाले, "नागरिकांच्या अडीअडचणीला सर्वात प्रथम धावून जातो तोच खरा शिवसैनिक. अशा शिवसैनिकांची ताकद या दक्षिण सोलापूर मतदारसंघात चांगली असून यापूर्वी शिवसेनेच्या चिन्हावर या भागातून आमदार निवडून आलेला आहे. आत्ता पुन्हा एकदा सर्वांनी नव्या जोमाने कामाला लागावे आणि जनतेच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवून शिवसेनेचा विचार तळागाळात पोहचवावा. विद्यमान आमदाराविषयी जनतेच्या मनात प्रचंड रोष असून जनता या लोकांना वैतागली आहे. मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे असून सत्तेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे.' 
शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर म्हणाले, "जुने ते सोने हे खरे असले, तरी "नवे ते हवे' हेही तितकेच खरे आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून नवयुवकांना पक्षाशी जोडण्यासाठी सहाय्य करावे. निवडणुका येतील-जातील पण, 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेल्या ब्रीदवाक्‍याप्रमाणे सदैव कार्यरत रहावे म्हणजे आपोआप पक्ष मजबूत होईल व आगामी काळात भगवा फडकेल.' अमर पाटील यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिल्याबद्दल आभार व्यक्त करत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह विधानसभेसाठी पक्ष संघटनेची बांधणी करणार असल्याचे सांगितले. 

यावेळी तालुकाप्रमुख योगिराज पाटील, रमेश नवले व गंगाराम चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले. भीमाशंकर म्हेत्रे यांनी प्रास्तविक केले. निरंजन बोध्दूल यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी आप्पासाहेब व्हनमाने, भागवत जोगदनकर, रेवण बुक्कानरे, विकास म्हेत्रे, सुनील कुंभार, विजय वाले, विश्वनाथ अलकुंटे, प्रदीप भोसले, रोहित तडवळकर, सागर कोकरे, शिवशंकर बिराजदार, दत्तात्रय माने, प्रवीण बगले, मल्लिकार्जुन शिरढोणकर, विशाल पतंगे, धर्मेश चौगुले, राम चौगुले, धर्मराज बगले, अंबण्णा रामपुरे, लिंगराज तोरणगी, शिवराज मलशेट्टी, गजानन हलसंगे, अभिजीत ननवरे, उमेश कमळे, राजू कोळी, नंदकुमार लांबतुरे, सखाराम वाघ, किरणसिंह चव्हाण, आकाश राठोड, अजय खांडेकर, रविकांत कांबळे, रमेश राठोड, शशिकांत पटणे, महेश दाजगे, अशोक हजारे, अनिल स्वामी, महेश बिराजदार, रवींद्र कोळी, नागनाथ चडचणे, किरण मोडके, श्रीनिवास पोलू, आनंद मुसळे, अंबादास चिल्लाळ, अभिजीत जाधव, राहुल गंधूरे, दौला हिरापूरे, किरण पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते. 


संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com