
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने रात्रीची संचारबंदी आता 14 मार्चपर्यंत वाढविली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. तर दहावी-बारावीचे वर्ग सुरु राहणार असून कोरोनाचे नियम पाळून या विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासेस सुरु राहतील, असे नवे आदेश आज महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले आहेत.
सोलापूर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने रात्रीची संचारबंदी आता 14 मार्चपर्यंत वाढविली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. तर दहावी-बारावीचे वर्ग सुरु राहणार असून कोरोनाचे नियम पाळून या विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासेस सुरु राहतील, असे नवे आदेश आज महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले आहेत.
महापालिका आयुक्तांनी काढले नवे आदेश...
- सोलापूर शहरात 14 मार्चपर्यंत असेल रात्रीची (रात्री 11 ते पहाटे पाच) संचारबंदी
- जीवनावश्यक वस्तू (दूध, भाजीपाला, फळे), वृत्तपत्र सेवेसह अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापना, व्यक्तींना संचारबंदीतून सुट
- शैक्षणिक संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळा (दहावी-बारावीचे वर्ग व त्यांचे खासगी क्लासेस वगळून), महाविद्यालये, खासगी शिकवणी राहणार बंद
- शहरातील अभ्यासिका, ग्रंथालयांना 50 टक्के उपस्थितीत सुरक्षित अंतर ठेवून असेल परवानगी
- विवाहासाठी 50 जणांनाच असेल परवानगी; मंगल कार्यालयांनी नियम मोडल्यास होणार कायदेशीर कारवाई
- सर्व हॉटेल, रेस्टॉरंट व बार हे रात्री 11 वाजता वाजेपर्यंतच सुरु राहतील; आस्थापनासाठी 50 टक्क्यांचा नियम
- प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे सुरु करण्यास असेल अटीवर परवानगी; यात्रा, उत्सव, उरुस, वारीवर बंदी
- सर्व प्रकारचे खेळाचे सामने, स्पर्धांना 14 मार्चपर्यंत बंदी; विनामास्क फिरणाऱ्यांना प्रत्येकी एक हजाराचा दंड
- सोलापूर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने रात्रीची संचारबंदी आता 14 मार्चपर्यंत वाढविली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. तर दहावी-बारावीचे वर्ग सुरु राहणार असून कोरोनाचे नियम पाळून या विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासेस सुरु राहतील, असे नवे आदेश आज महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले आहेत.
शहरातील शैक्षणिक संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळा (दहावी-बारावीचे वर्ग व त्यांचे खासगी क्लासेस वगळून), महाविद्यालये, खासगी शिकवणी बंद ठेवल्या जाणार आहेत. शहरातील अभ्यासिका, ग्रंथालयांना 50 टक्के उपस्थितीत सुरक्षित अंतर ठेवून परवानगी दिली जाणार आहे. विवाहासाठी 50 जणांनाच परवानगी असणार आहे. त्यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. मंगल कार्यालयांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. शहरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट व बार हे रात्री 11 वाजता वाजेपर्यंतच सुरु राहतील, असेही आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे सुरु करण्यास निर्बंध पाळून परवानगी राहील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तर या काळात यात्रा, उत्सव, उरुस, वारीवर बंदी असेल, असेही त्यांनी आदेशात नमूद केले आहे.