धक्कादायक! आईनेच केला नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून 

crime
crime
Updated on

बार्शी (सोलापूर) : वांगरवाडी (ता. बार्शी) येथे भर दिवसा घरातील पाळण्यात झोपलेल्या नऊ महिन्यांच्या मुलाचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याप्रकरणी जन्मदात्या आईलाच पोलिसांनी अटक केली असून तिने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे बार्शी तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

अश्विनी स्वानंद तुपे (वय 23) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिने तिच्या नऊ महिन्यांचा चिमुकला मुलगा सार्थक स्वानंद तुपे याचा गळा आवळून खून केला. महिलेला बांधून तिचे मणीमंगळसूत्र लुटून शेतातून एकजण फरार झाला आहे, असा बनाव तिने दीर आनंद तुपे यांना सांगितला होता. त्यानुसार खुनाचा गुन्हा तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या तपासाबाबत मार्गदर्शन करून चार पथके तयार केली अन्‌ वेगवेगळ्या पद्धतीने तपासाची दिशा ठरवली होती. वांगरवाडीत पोलिसांनी तळ ठोकून माहिती संकलन केले होते. 

सार्थक याची आई अश्विनी हिला अटक करून पोलिसांनी माहिती विचारली असता तिने पहिला मुलगा अडीच वर्षाचा तर दुसरा नऊ महिन्यांचा असल्याने सार्थकला सांभाळण्याचा खूप त्रास होत असल्याने मीच मोबाईल चार्जरच्या वायरने त्याचा गळा आवळून खून केला, असे तिने सांगितले. ही घटना वांगरवाडी येथे 22 ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या दरम्यान घडली होती. शवविच्छेदन अहवाल, अश्विनीची चौकशी करीत असताना तिच्यामध्ये दिसणारे हावभाव, पोलिसांनी विविध प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर अश्विनीने गुन्हा कबूल केला, असे उपअधीक्षक भोरे यांनी सांगितले. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com