सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहात आढळले नऊ पॉझिटिव्ह ! शहरात आज 37 नवे रुग्ण

तात्या लांडगे
Saturday, 28 November 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील एक लाख 20 हजार 577 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले दहा हजार 335 कोरोनाचे रुग्ण 
  • आज 743 संशयितांची टेस्ट; नव्याने आढळले 37 पॉझिटिव्ह 
  • शहरातील 44 रुग्ण आज झाले बरे; आता उरले 438 रुग्ण 

 सोलापूर : सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहात आज नऊ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर जुळे सोलापूर, दमाणी नगर, शेटे नगर (लक्ष्मी पेठ), शिवाजी नगर (मोदीखाना) व बुधवार पेठेत प्रत्येकी दोन रुग्ण तर आंबेडकर नगर (गुरुनानक चौक) येथे तीन पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील रुग्णसंख्या आता दहा हजार 335 झाली असून त्यातील नऊ हजार 336 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

ठळक बाबी... 

  • शहरातील एक लाख 20 हजार 577 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले दहा हजार 335 कोरोनाचे रुग्ण 
  • आज 743 संशयितांची टेस्ट; नव्याने आढळले 37 पॉझिटिव्ह 
  • शहरातील 44 रुग्ण आज झाले बरे; आता उरले 438 रुग्ण 

 

शहरात आज जुनी मिल चाळ, चिंतनवार वस्ती (मोदीखाना), रामलिंग नगर (विजयपूर रोड), लक्ष्मी नगर (देगाव), रेणुका नगर, वामन नगर (जुळे सोलापूर), एसआरपी कॅम्प, आरटीओ कार्यालयाजवळ, हुनमान नगर (भवानी पेठ), मनपा कॉलनी (सात रस्ता) आणि अवंती नगर (मुरारजी पेठ) येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. ऍक्‍टिव्ह रुग्णांच्या संपर्कातील एकूण 105 संशयित होम क्‍वारंटाईन आहेत. तर 50 संशयित इन्स्टिट्यशूनल क्‍वारंटाईन असून 44 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आतापर्यंत शहरातील पाच हजार 476 पुरुषांनी तर तीन हजार 860 महिलांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील मृतांची संख्या 561 असून मागील दोन दिवसांत एकाही रुग्ण कोरोनामुळे दगावलेला नाही. दरम्यान, आतापर्यंत शहरातील सहा हजार 120 पुरुष आणि चार हजार 215 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine positives found in Solapur Central Jail; solapur city today 37 new patients