सोलापुरातून बाहेर पडायचे असेल तर ही बातमी आवश्‍य वाचा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

उद्यापासून (शुक्रवार) हे रस्ते तीन मे पर्यंत बंद असणार आहेत. त्यामध्ये सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारा हिरज ते  विद्यापीठ जवळ पुणे हायवे रोडला मिळणारा रस्ता, तिर्हे ते शिवनी, केगाव ते खेड अंतर्गत रस्ता, हगलुर ते दहिटणे रस्ता, पाथरी ते बेलाटी रस्ता, सोरेगाव - डोणगाव ते नंदूर रस्ता, सोरेगाव ते समसापुर रस्ता, सोरेगाव- डोणगाव ते तेलगाव रस्ता व अक्कलकोट विभागात वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारा विडी घरकुल कुंभारी ते विजयनगर मार्गे सोलापूर हा रस्ता बंद करण्यात आला आहे.

सोलापूर : सोलापूर शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूर शहरातील काही लोक शहराच्या बाजूच्या खेड्यामध्ये राहण्यास येऊ लागले आहेत. त्यामुळे येत्या काळात सोलापूर शेजारी असलेल्या खेड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सोलापूरच्या शेजारी असलेल्या नऊ खेड्यांमध्ये येणारे रस्ते बंद करण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतला आहे. 
उद्यापासून (शुक्रवार) हे रस्ते तीन मे पर्यंत बंद असणार आहेत. त्यामध्ये सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारा हिरज ते  विद्यापीठ जवळ पुणे हायवे रोडला मिळणारा रस्ता, तिर्हे ते शिवनी, केगाव ते खेड अंतर्गत रस्ता, हगलुर ते दहिटणे रस्ता, पाथरी ते बेलाटी रस्ता, सोरेगाव - डोणगाव ते नंदूर रस्ता, सोरेगाव ते समसापुर रस्ता, सोरेगाव- डोणगाव ते तेलगाव रस्ता व अक्कलकोट विभागात वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारा विडी घरकुल कुंभारी ते विजयनगर मार्गे सोलापूर हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
या गावांना आवश्यक असलेली अत्यावश्यक सेवा,  वैद्यकीय सेवा व शासनाने परवानगी दिलेल्या सर्व सेवा, सुविधा पुरविण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तिर्हे ते सोलापूर, शिवनी ते हिरज, खेड ते बाळे, हगलुर ते तुळजापूर रोड,  पाथरी ते तिर्हे, नंदुर ते सोरेगाव, समशापूर ते हत्तुर,  तेलगाव ते पाथरी आणि वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील क्रांती चौक ते मेन रोड सोलापूर - अक्कलकोट हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोलापूर शहरात कोरोनाविषयीचा संसर्ग प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने त्यामुळे शहरातील लोक आजूबाजूच्या खेड्यामध्ये राहण्यास येत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाणे व वळसंग पोलिस ठाण्याच्यावतीने अहवालाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आली होती. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सोलापूर शहरातून ग्रामीण भागात येणारे रस्ते बंद करावेत अशी मागणी सोलापूर तालुका व वळसंग पोलिस ठाण्याच्यावतीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine road leading from Solapur to neighboring villages close