
- केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत जिल्ह्यात नऊ तूर खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. 28 डिसेंबरपासून एनईएमएल (NEML) पोर्टलवर तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी भास्कर वाडीकर यांनी दिली.
सोलापूर : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत जिल्ह्यात नऊ तूर खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. 28 डिसेंबरपासून एनईएमएल (NEML) पोर्टलवर तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी भास्कर वाडीकर यांनी दिली. खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या उच्च प्रतीच्या (FAQ) तुरीला प्रति क्विंटल सहा हजार रुपये दर देण्यात येणार आहे.
तूर उत्पादक शेतकऱ्याकडे ऑनलाइन नोंदणीसाठी सात - बारा उतारा (त्यावर तूर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे), आधार कार्ड, बॅंक पासबुकची झेरॉक्स (बॅंक अकाउंट नंबर व आयएफएससी कोड असावा) या कागदपत्राची आवश्यकता आहे. खरेदी केंद्रासमोर दर्शविलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी. तूर खरेदीस सुरवात झाल्यानंतर शेतकऱ्यांना एसएमएस आल्यानंतरच तूर स्वच्छ करून वाळवून उच्च प्रतीच्या दर्जाची तूर खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावी. जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. भास्कर वाडीकर यांनी केले आहे.
ही आहेत तूर खरेदी केंद्रे
संपादन : श्रीनिवास दुध्याल