esakal | महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी मिळणार अडीच हजार रूपये! चार हजारांची मिळणार उचल 
sakal

बोलून बातमी शोधा

solapur-muncipal_201911323895.jpg

महापौरांमुळे वाढले पाचशे रुपये 
यंदा दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना प्रत्येकी चार हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे आणि उचल रक्‍कमही वाढवून चार हजार रुपये करावी, अशी मागणी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याकडे केली होती. त्यानंतर आयुक्‍तांनी वित्त विभागाशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे आयुक्‍तांनी स्पष्ट केले. त्यानंतर तिजोरीची परिस्थिती बिकट असतानाही महापौरांच्या मागणीचा मान म्हणून गतवर्षीच्या तुलनेत सानुग्रह अनुदानात पाचशे रुपयांची तर उचल रकमेत दोन हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. 

महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी मिळणार अडीच हजार रूपये! चार हजारांची मिळणार उचल 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : दिवाळीनिमित्त महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. तर प्रत्येकी चार हजार रुपयांची उचल देण्याचा निर्णय मंगळवारी (ता. 3) घेण्यात आला आहे.

महापालिकेतील कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची संख्या चार हजार सहाशेपर्यंत असून कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या साडेपाचशेहून अधिक आहे. या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी दोन हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. तर प्रत्येकी दोन हजार रुपयांची उचल देण्यात आली होती. महापालिकेने मागील तीन वर्षांत सुमारे एक हजार 700 कोटी रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले. मात्र, एकदाही ते गाठता आलेले नाही. तीन वर्षांत उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल अकराशे कोटी रुपयांचा कर भरणा कमी झाला आहे. त्यामुळे शासकीय निधी आणि जीएसटी अनुदानातून महापालिकेची भागवाभागवी सुरु आहे. मागच्या वर्षी वार्षिक बजेट झाले नसून यंदा बजेटमध्ये 10 टक्‍क्‍यांची वाढ करण्याऐवजी कपातच करावी लागणार आहे. नगरसेवकांना ठरल्याप्रमाणे भांडवली निधी मिळू शकलेला नाही. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार सानुग्रह अनुदान व उचल रक्‍कम मिळू शकलेली नाही. 

महापौरांमुळे वाढले पाचशे रुपये 
यंदा दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना प्रत्येकी चार हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे आणि उचल रक्‍कमही वाढवून चार हजार रुपये करावी, अशी मागणी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याकडे केली होती. त्यानंतर आयुक्‍तांनी वित्त विभागाशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे आयुक्‍तांनी स्पष्ट केले. त्यानंतर तिजोरीची परिस्थिती बिकट असतानाही महापौरांच्या मागणीचा मान म्हणून गतवर्षीच्या तुलनेत सानुग्रह अनुदानात पाचशे रुपयांची तर उचल रकमेत दोन हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. 

सानुग्रह अनुदान अन्‌ चार हजारांच्या उचलचा आज निर्णय 
महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार महापालिका कर्मचाऱ्यांना वाढीव सानुग्रह अनुदान व उचल देण्याचा नियोजन होते. मात्र, सद्यस्थितीत महापालिकेची आर्थिक परिस्थिती तशी नसल्याने यंदा अडीच हजारांचे सानुग्रह अनुदान व चार हजार रुपयांची उचल दिली जाईल. त्याबाबत उद्या अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 
- पी. शिवशंकर, आयुक्‍त, सोलापूर महापालिका