ना...ना... मुझे छुना ना... दूर ही रहना परी हूँ मैं... 

No no don't touch me Stay away i am angel
No no don't touch me Stay away i am angel

सोलापूर : मेक्‍सिको सिटीतील झोकालो, मॉस्को सिटीतील रेड स्क्वेअर, चीनमधील तिआनान मेन स्क्वेअर ही आहेत जगातील सर्वांत मोठ्या चौकांची नावं. आम्हा सोलापूरकरांच्या दृष्टीने याच तोडीचा चौक (आमचं लैवेगळं असतंय) म्हणजे सात रस्ता. नेहमीच गजबजलेला. याठिकाणी अन्य शहरातील कुणी दुचाकीस्वार आला तरतोकन्फ्यूजच होतो, की नक्की कुठून कुठून वाहनं येताहेत ते पाहून. कुठून सिटीबस, तर कुठून टमटम, मधूनच एखादा दुचाकीवालावाऱ्यासारखा भर्रर्रकन येऊन निघूनही जातो. पणइथं कधी फार मोठा अपघात झाल्याचं एकवात नाही. असा हानेहमीच गजबजलेलाअस्सल सोलापुरी झोकालो, रेड स्क्वेअर, मेन स्क्वेअर म्हणजेच आमचा सात रस्ता ओ, सध्या कोरोनाच्या कर्फ्यूत अक्षरशः सुनसान झालाय. नाही म्हणायला लष्करकडेजाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाला चारदोन पोलिस खुर्च्या टाकून बसलेत इतकीच काय ते... अक्षरशः ह्या या चौकातीलसातहीरस्ते भयानक दिसताहेत. 

या रस्त्यावरील ही भयानक, निरव शांतता सहन होईना म्हणून गाडी रंगभवनच्या दिशेने दामटली. नेहमी गजबजलेले इंडिया टीमाणसाविना प्रथमच दिसले. थोडं पुढं जाऊन अश्विनी हॉस्पिटलचा कानोसा घ्यावा म्हटलं म्हणून तिकडं वळलो, पणतिथहीसध्या गर्दी नाही. पेशंटबरोबरचा एखाददुसरानातेवाईक हॉस्पिटलच्या आवारात रेंगाळताना दिसला. त्याही गडबडती एकाने माझ्या गळ्यातील पत्रकाराचा पास पाहून विचारलं, खरंच सग्गळं सोलापूर बंद हाय का ओ. तुम्ही फिरता म्हणून इचारलो. त्याच्याशी थोडंफार बोलून तिथून बाहेर पडलो. पुन्हा रंगभवन रोडला आलो. इथं खवय्यांची हक्काची ठिकाणं असलेलील पिझ्झा अन बिर्याणीची सेंटर्स तरनिस्तेज दिसली. 

रंगभवन परिसरातील चर्च हेसर्वधर्मीयांच्या खुणेचे ठिकाण. कुठंय म्हणून विचारलं तरया रस्त्यावरील कुणीही याचर्चच्या खुणेचाहावाला देणारच, पणया चर्चची सर्व दार बंद आहेत, जणू येशूखिस्त आपल्या भक्तांना सांगताहेत, मी माझ्या चर्चमध्ये आहे, तुम्ही तुमच्या घरी राहा. बाहेर पडू नकात. 

स्मार्टसिटीत आपलं रुपडं बदललेले रंगभवन आता अर्बनप्लाजा नाव धारण करून दिमाखात उभे आहे. तेथील न्यूआन साईनचे डिस्प्ले सध्या घरातून बाहेर पडू नकात, कोरोनाशी आपला लढा यशस्वी करून असा संदेश देत आहे, पण ते वाचायला रस्त्यावर चिटपाखरूही नाही. इथले स्ट्रिटलाईट, अर्बनप्लाजामधील सर्व लाईटस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इथले निर्मनुष्यरस्ते अधिकच भयानवाटताहेत. 

होममैदानाच्यादोन्हीही बाजूला नव्याने बनविलेल्या दोन्ही नव्याकोऱ्या रस्त्यावरील एलइटी दिवे सुरू आहेत. खूप देखणे दिसणारे हे रस्ते मात्र त्यांच्या दागिन्यांअभावी म्हणजे रहदारीअभावी निस्तेज भासताहेत. पार्क चौकातील डॉ. आंबेडकर पुतळा पोलिसचौकीजवळ चारदोन पोलिस दिसले, त्याच्या विरूद्ध दिशेला म्हणजे पार्क स्टेडियम गाळ्याच्या बाहेरील बाजूस काही परराज्यातील मजूर विश्रांती घेताना दिसून आले. पार्क चौकतेसरस्वती चौक यानेहमीच गजबज असलेल्यामार्गावर अक्षरशः टाचणी पडली तरी आवाज यावा इतकी शांतता आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या बाजूला पोलिस थांबून येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी, तपसणी करत आहेत. इथं एकानं औषधे आणण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगितले, पणत्याच्याकडेप्रिस्क्‍र्रिप्शन नसल्याने पोलिसांनी त्याच्या पार्श्वभागावार काठीचा फटका दिला. 

बसस्टॅंण्डमध्ये ना प्रवाशांची लगबग, ना कंडक्‍टरच्या शिट्टीचा आवाज, नागाड्यांचेहॉर्न, नास्पिकरवर सतत वाजणारीप्रविणच्या लोणच्याची जाहिरात... होती ती फक्त भयाण शांतता, नकोशी वाटणारी शांतता. नाही म्हणायला इथं एक जाणवलं नेहमीच्या टू बाय टूच्या लाल रंगाच्या बसेस एका बाजूला ओळीतउभ्या होत्या तरशुभ्रशा शिवशाही तिथंही भाव खात स्वतंत्रपणे ऐसपैस जागेत दिमाखदारपणेस्वतंत्र अस्तिव दाखवत उभ्या होत्या. ते पाहून पॉपसिंगर सुनिता रावच्या गाण्याचे बोल मला आठवले ना...ना...मुझे छुना ना... दूर ही रहनापरी हूॅ मै... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com