बसस्थानकात व्हील चेअरचा पत्ता नाही : प्रवाशांची होतेय अडचण

विजय थोरात
Thursday, 28 January 2021

सोलापूर बसस्थानक हे मोठ आहे. सोलापूर बसस्थानकांवरुन पुणे, मुंबई, पंढरपूर, अमरावती, हिंगोली, लातूर, बीड अशा मोठ्या शहरांमध्ये प्रवासी जात असतात. यात दिव्यांग प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु त्यांना रॅम्प आणि व्हील चेअरची व्यवस्था नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिव्यागांना घेउन रिक्षा थेट एसटीच्या दारात येत आहेत. आगाराच्या दररोज 600 बसमधून 22 हजार प्रवाशांची ये-जा करत असतात. मात्र येथे रॅम्प आहे. मात्र याचा वापर होत नसल्याचे दिसून आहे. व्हील चेअर उपलब्ध नाही. बसस्थानकांवर व्हील चेअर नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करत बसमध्ये प्रवेश करावा लागत आहे. 

सोलापूरः राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारातून दररोज 22 हजार प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची मोठी गर्दी असते. यामध्ये दिव्यागांचीही संख्या मोठी आहे. दिव्यागांना बसस्थानकांवर बसमध्ये चढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक बसस्थानकांवर व्हील चेअर आणि रॅम्पची व्यवस्था नसल्याने दिव्यांगासह रुग्णांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 
सोलापूर बसस्थानक हे मोठ आहे. सोलापूर बसस्थानकांवरुन पुणे, मुंबई, पंढरपूर, अमरावती, हिंगोली, लातूर, बीड अशा मोठ्या शहरांमध्ये प्रवासी जात असतात. यात दिव्यांग प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु त्यांना रॅम्प आणि व्हील चेअरची व्यवस्था नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिव्यागांना घेउन रिक्षा थेट एसटीच्या दारात येत आहेत. आगाराच्या दररोज 600 बसमधून 22 हजार प्रवाशांची ये-जा करत असतात. मात्र येथे रॅम्प आहे. मात्र याचा वापर होत नसल्याचे दिसून आहे. व्हील चेअर उपलब्ध नाही. बसस्थानकांवर व्हील चेअर नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करत बसमध्ये प्रवेश करावा लागत आहे. 
रॅम्पचा वापर नाहीच 
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी व्हील चेअर आत नेता यावी, यासाठी रॅम्प असणे आवश्‍यक आहे. मात्र बसस्थानकात रॅम्प स्थानकाच्या कोपऱ्यात बांधण्यात आला आहे. त्यामुळे रॅम्पची अवस्था म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. बसस्थानकातील डांबरीकरण व बसस्थानक एक दोन पायरीचे आहे. त्यामुळे फारसा त्रास होत नसला तरी रॅम्प केल्यास दिव्यांग, जेष्ठ नागरिकांना चांगलाच फायदा होणार आहे. 

चढ-उतार करताना खूप त्रास

वाढत्या वयानुसार बसमध्ये चढ-उतार करताना खूप त्रास होतो. हॉस्पिटल आणि इतर कामांनिमित्त बाहेरगावी जावे लागते. बसने प्रवास करावा लागतो. मात्र महामंडळाच्या सोलापूर आगारात कोणत्याही प्रकारची दिव्यागांसाठी व्यवस्था नाही. 
-श्‍याम कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक 

दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था

सोलापूर बसस्थानकांत जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था आहे. सध्या व्हील चेअर उपलब्ध नाहीत. शहरातील सामाजिक संस्थांकडे व्हील चेअर मागितल्या आहेत. 
-प्रमोद शिंदे, स्थानक प्रमुख, सोलापूर  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No wheelchair address at bus stand: Passengers have problems