मास्क नसल्यास आता पाचशे रुपयांचा दंड ! जिल्हाधिकाऱ्यांनी दंडाचे बदलले निकष 

तात्या लांडगे
Saturday, 24 October 2020

आदेशातील ठळक बाबी.. 

  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्‍यकता वाटेल अशा उपायोजना करण्यास परवानगी 
  • आपत्ती प्रतिबंधतात्मक उपाययोजना करण्यासाठी तथा आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी वाढवली दंडाची रक्कम 
  • सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर रुमाल, मास्क बंधनकारक 
  • सोशल डिस्टन्सचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी दारू, पान- तंबाखूचे सेवन करु नये 
  • सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क तथा रुमाल न बांधणाऱ्यांना आता भरावा लागणार 500 रुपयांचा दंड 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात 29 हजार 744 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 878 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांनी नियमांचे पालन करावे, या हेतूने आता जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड करण्याचे नवे आदेश काढले आहेत. त्याच्या अंमलबजावणीने उद्या (ता. 25) रविवारपासून केली जाणार आहे.

आदेशातील ठळक बाबी.. 

  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्‍यकता वाटेल अशा उपायोजना करण्यास परवानगी 
  • आपत्ती प्रतिबंधतात्मक उपाययोजना करण्यासाठी तथा आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी वाढवली दंडाची रक्कम 
  • सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर रुमाल, मास्क बंधनकारक 
  • सोशल डिस्टन्सचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी दारू, पान- तंबाखूचे सेवन करु नये 
  • सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क तथा रुमाल न बांधणाऱ्यांना आता भरावा लागणार 500 रुपयांचा दंड 

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाची वाढती परिस्थिती लक्षात घेता, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींना शंभर रुपयांऐवजी पाचशे रुपयांचा दंड करावा, अशी विनंती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 व कलम 64 मधील तरतुदीचा वापर करुन वाढीव दंडास परवानगी दिली आहे. शंभर रुपयांचा दंड असल्याने अनेकांकडून नियमांचे उल्लंघनच केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मास्कचा वापर केल्याने कोरोनापासून बचाव होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर आता दंडाची रक्‍कम वाढविल्यास निश्‍चितपणे सर्वजण मास्कचा वापर करतील, असा विश्‍वास या आदेशातून व्यक्‍त करण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now a fine of five hundred rupees for not wearing a mask! The Collector changed the criteria of the fine