esakal | धक्कादायक ! वैद्यकीय अधिष्ठाता म्हणाले... तर सोलापुरातील 80 टक्के लोकांना होईल कोरोना
sakal

बोलून बातमी शोधा

Now the medical superintendent said then 80 percent of people will have corona

सोशल डिस्टन्स न पळता झालेली गर्दी धोकादायक
लॉकडाऊन शितील झाल्यानंतर सोलापुरातील विविध ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले आहेत. आता सोलापूर शहरातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अशी गर्दी टाळणे, खूप महत्त्वाचे आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्ससह अन्य नियम न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यास, लक्षणे नसलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हजारोंच्या संपर्कात येईल आणि 80 टक्के नागरिकांना कोरोनाची बाधा होईल, असा धोका आहे. खासगी दवाखाने कमी-अधिक प्रमाणात उघडे असल्याने रुग्ण वाढल्यास उपचार करणे अवघड होईल. त्यामुळे सोलापूरकरांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे.
​- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर 

धक्कादायक ! वैद्यकीय अधिष्ठाता म्हणाले... तर सोलापुरातील 80 टक्के लोकांना होईल कोरोना

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सोलापूर शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर लक्षणे नसलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हजारोंच्या संपर्कात येऊ शकतो आणि त्यामुळे आगामी काळात 80 टक्के नागरिकांना कोरोना होईल, अशी भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता सोशल डिस्टन्ससह अन्य नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ठाकूर यांनी केले आहे. यापूर्वी वैद्यकीय अधिक्षकांनी तसा इशारा दिला होता.

सोलापुरात आतापर्यंत कोरोनामुळे 107 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये रक्तदाब मधुमेह हृदयरोग असे आजार असलेल्या 62 जणांचा समावेश आहे. सोलापुरातील बहुतांशी रुग्णांचा मृत्यू रुग्णालयात उशिरा दाखल केल्याने झाला आहे, असेही डॉ. ठाकूर म्हणाले. लवकर दाखल झालेल्या बऱ्याच व्यक्तींवर यशस्वी उपचार होऊन ते कोरोनामुक्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाला म्हणजे कोरोनाचा धोका संपला असा समज करु नका, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मृत्यू कमी करण्यासाठी डॉ. ठाकूर म्हणाले....

  • कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू कमी करण्यासाठी घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची पाहणी करणे आवश्यक आहे
  • 55 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवावे; दररोज त्यांचा ताप, नाडीचे ठोके, ऑक्सिजनचे प्रमाण, रक्तदाब याची तपासणी करणे आवश्यक आहे
  • 55 वर्षांवरील व्यक्तींच्या छातीचा एक्स-रे काढणे व त्यांची इको तपासणी करणे गरजेचे आहे
  • कोरोनाबाधित रुग्णांना झालेल्या संलग्न आजारावरील उपचार कायमस्वरूपी चालू ठेवावेत


Covid-19 साठी 152 जणांची टीम
सोलापुरात पाय रोवलेल्या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी 42 डॉक्टर्स, 80 नर्सिंग स्टाफ आणि 30 स्वच्छता कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे. प्रत्येक डॉक्टरसह अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सात दिवसांच्या कोरोना वार्डमधील ड्युटीनंतर सात दिवसांची विश्रांती देऊन अन्य ठिकाणी ड्यूटी दिली जात आहे. दरम्यान, कोरोना काळात श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात एक हजार 606 महिलांच्या प्रसूती यशस्वी पार पडल्या आहेत, असेही अधिष्ठाता डॉ. ठाकूर म्हणाले.