"एसटी'त झळकणार आता आगार प्रमुखाचा नंबर 

st photo
st photo
Updated on

सोलापूर : प्रवाशांच्या तक्रारी अथवा समस्यांचे तातडीने निरसन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सरसावले आहे. महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये आता आगारप्रमुखांचा नंबर झळकणार आहे. तुम्ही प्रवास करत असलेली ती बस ज्या आगाराची आहे त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक व त्या विभाग प्रमुखाचा दूरध्वनी क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करण्याची सूचनाच राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. 
हेही वाचा - खुशखबर...अंगणवाडी सेविकांची भरती सुरू...अधिक माहिती जाणून घ्या 
ग्राहकाच्या तक्रारी, समस्या आणि सूचनांचे निराकरण त्या - त्या पातळीवर तातडीने होणे आवश्‍यक आहे. यासाठी संबंधित आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांनी आपले उत्तरदायित्व ओळखून प्रत्येक प्रवाशाच्या तक्रारी अथवा समस्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे असल्याचेही परिवहनमंत्री परब यांनी सांगितले. प्रवासी सेवांचा दर्जा उंचावणे व अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चालक - वाहकाच्या बरोबरच अधिकाऱ्यांनी देखील प्रवाशांच्या समस्या जाणून त्याचे तातडीने निरसन करणे महत्त्वाचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी बसमध्ये आगार प्रमुख व विभाग प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित करण्याबाबतचे परिपत्रक लवकरच एसटी प्रशासनाकडून निर्गमित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com