तीन मृत्यूसह सोलापुरात बुधवारी 42 कोरोनाबाधित , एकूण पॅाझिटीव्ह 1310

तीन मृत्यूसह सोलापुरात  बुधवारी 42 कोरोनाबाधित , एकूण पॅाझिटीव्ह 1310
Updated on

सोलापूर :  महापालिका क्षेत्रात आज बुधवारी ४२ नवीन रुग्ण आढळले. आजअखेर कोरोनाबाधितांची संख्या  १३१० वर पोचली आहे. तर आज तीनजणांचा मृत्यू झाला. 

महापालिकेतील कर्मचारी तथा कामगार नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा अहवाल आज सकाळी पॉझिटीव्ह आला आहे. आतापर्यंत महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आज आणखी एका कामगार नेत्याची भर पडली. कोरोनाची लागण झालेले एक नगरसेवक, एक नगरसेविका, नगरसेविकांचे पती व त्यांचे कुटुंबिय सध्या कोरोनामुक्त झाले आहेत. उच्चपदस्थ पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबियावर आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर खासगी आणि रेल्वे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तेही लवकरच कोरोनामुक्त होणार असून, त्यांनाही घरी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

शहरातील मुरारजी पेठ गोकुळ कॉलनी ए ब्लॉक, लोकमान्यनगर, गांधीनगर, भवानी पेठ, देगाव, पंजाब तालीम उत्तर कसबा, अमृतनगर विजयपूर रस्ता, न्यू बुधवार पेठ सम्राट चौक, सह्याद्री पार्क अक्कलकोट रस्ता, देशमुख पाटील वस्ती, विजापूरनाका, राजेंद्रनगर कुमठा नाका, हैदराबाद रस्ता, गुरूनानक चौक, कुमठा नाका, म्युन्सिपल कॅालनी बुधवार पेठ, गांधीनगर, व्यंकटेशनगर, गीतानगर, करलीनगर, राहूलनगर बाळे, लष्कर, परिचारिका वसतीगृह, शिवाजी चौक,  या परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत. 

बुधवारी ३६२ अहवालांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३२० अहवाल निगेटिव्ह आले, तर ४२ अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत ४९ जण रुग्णालयातून बरे होऊन परत गेले. आज तीनजणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये अश्विनीरुग्णालयात दोन, तर गंगामाई रुग्णालयात एक मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ८४०० व्यक्तींच्या अहवालाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८२७९ जणांचा अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालापैकी ६९६९ अहवाल निगेटिव्ह, तर १३१० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १२१ अहवाल प्रलंबित आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com